KBC Prize Money: खरंच कंटेस्टंटना संपुर्ण बक्षीस रक्कम मिळते का? जाणून घ्या

KBC मध्ये स्पर्धकांना संपुर्ण बक्षीस रक्कम मिळत नाही, कट होऊन इतकी रक्कम येते हातात?

Updated: Aug 24, 2022, 02:37 PM IST
KBC Prize Money:  खरंच कंटेस्टंटना संपुर्ण बक्षीस रक्कम मिळते का? जाणून घ्या  title=

मुंबई : सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा 'कौन बनेगा करोडपती' हा शो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक पाहत असतो. बिग बी अमिताभ बच्चन हा शो होस्ट करत असतात. या शोची प्रेक्षकांमध्ये खुप क्रेझ आहे. मात्र हा शो पाहणाऱ्या प्रेक्षकांना नेहमी असं वाटतं की, कंटेस्टंटना जिंकलेली सर्व रक्कम मिळत असेल. मात्र तसे नाही. याउलट टॅक्स कट होऊन कंटेस्टंच्या हातात रक्कम येत असते. नेमके कंटेस्टंच्या हातात किती बक्षीस रक्कम येते व किती टॅक्स कट होतो ते जाणून घेऊयात. 

सामान्य माणसाला करोडपती बनवणारा हा शो आहे. या शोमध्ये येण्याचे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते आणि अनेकांचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. अनेक लोक करोडपती झाले आहेत. त्यामुळे  कंटेस्टंटने 50 लाख किंवा 1 कोटी 7 कोटी जिंकणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही. मात्र या शोबद्दल तुम्हाला ही गोष्ट माहीतीय का? स्पर्धकांना त्यांची बक्षिसाची रक्कम कधीच पूर्ण मिळत नाही. बक्षिसांच्या रकमेवर कराची मोठी रक्कम कापली जाते, त्यानंतरच पैसे स्पर्धकाच्या बँक खात्यात जमा होतात.

बक्षिसाची रक्कम अर्धी का मिळते? 
जर एखाद्या स्पर्धकाने 50 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली, तर त्याला एक किंवा दोन लाख नाही तर संपूर्ण 13.30 लाख रुपये टॅक्स म्हणून भरावे लागतील. म्हणजेच कोणत्याही स्पर्धकाला दाखविल्या जाणाऱ्या बक्षिसाची रक्कम कमी मिळते हे तुम्हाला समजले असेलचं. 

समजा, एका स्पर्धकाने 50 लाख रुपये जिंकले आहेत. त्याला बक्षिसाच्या रकमेच्या 30 टक्के म्हणजे 12 लाख रुपये कर म्हणून भरावे लागतील. याशिवाय बक्षीस रकमेतून 10 टक्के (रु. 13,125) अधिभार आणि 4 टक्के (रु. 5,250) उपकरही कापला जातो. एकूणच, स्पर्धकाच्या हातात 50 लाखांच्या बक्षीस रक्कमेऐवजी केवळ 35 लाख रुपये मिळतात. 

दरम्यान मुळ बक्षीस रक्कमेपेक्षा कंटेस्टंच्या हातात अर्धी रक्कम येते. त्यामुळे कंटेस्टंना संपुर्ण बक्षीस रक्कम मिळत असल्याचा समज येथे खोटा ठरत आहे.