अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, अशी पडतेय महागात

अमिताभ बच्चन हे एक असे हिरो आहेत जे नेहमीच चाहत्यांशी जोडले जातात.

Updated: Nov 9, 2021, 03:44 PM IST
अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, अशी पडतेय महागात

मुंबई : अमिताभ बच्चन हे एक असे हिरो आहेत जे नेहमीच चाहत्यांशी थेट जोडले जातात. दररोज ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या भावना शेअर करतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्यांनी चूक केली आहे, या पोस्टवर त्यांच्या चाहत्याने त्यांना त्यांची चूक सांगितली आहे आणि या चाहत्याच्या पोस्टला बीग बींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ यांनी आपली चूक मान्य केली
अमिताभ बच्चन यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून त्यात त्यांनी चुकीचं इंग्रजी लिहिलं आहे. या चुकीने त्यांच्या एका चाहत्याचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यांनी कमेंट करून अमिताभ यांना ती चूक लक्षात आणून दिली. अमिताभ यांनीही ही चूक मोठ्या मनाने मान्य करून, मन मोठं दाखवत ती लगेच सुधारली. एवढंच नाही तर त्यांनी त्या चाहत्याचे आभारही मानले आहेत.

फॅनने चुका मोजल्या
हा चाहता राजेश पांडे आहे. जो पटनाच्या मलासलमी पोलीस स्टेशन हद्दीतील नंदगोला येथील रहिवासी आहे. त्यांनी बच्चन यांना पटना येथे येऊन छटपूजा करण्याचं आवाहनही केलं आहे. याआधी राजेश कुमार यांनी 'दसरा' या हिंदी शब्दाच्या स्पेलिंगवर अमिताभ बच्चन यांचं लक्ष वेधलं होतं. ती पोस्टही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

बिहारला येण्याचं निमंत्रण 
अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवर सलीम-जावेद या प्रसिद्ध लेखक जोडीला इंग्रजीत 'डुओ' ऐवजी 'दुआ' लिहिण्याची चूक केली होती. यावर व्यत्यय आणत राजेशने  'Duo' हा  बरोबर शब्द सुचवला, जो बिग-बींनी तत्काळ स्वीकारला आणि आपली चूकही सुधारली. राजेश यांनी बच्चन यांना पटना येथे येऊन छट मैय्याचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन केलंय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x