दिव्यांग मुलांसोबत बिग बींचा अनोखा प्रजासत्ताक दिन

संपूर्ण देशात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

Updated: Jan 26, 2020, 09:58 PM IST
दिव्यांग मुलांसोबत बिग बींचा अनोखा प्रजासत्ताक दिन  title=

मुंबई : संपूर्ण देशात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याच दिनाचे औचित्य साधत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिव्यांग मुलांसोबत राष्ट्रगीत सादर केले. बिग बींनी सांकेतिक भाषेचा वापर करत या मुलांसोबत राष्ट्रगीत गायले आहे. सध्या बिग बींचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

ट्विटर हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी अत्यंत भावूक कप्शन दिले आहे. 'माझा गर्व, माझा देश, माझा प्रजासत्ताक दिन.. ज्या मुलांना ऐकता येत नाही काहींना बोलता येत नाही अशा मुलांसोबत राष्ट्रगीत सादर करण्याची संधी मिळाल्यामुळे मी फार आभारी आहे.' असं वक्तव्य त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. 

प्रत्येक वर्गात बच्चन यांचे चाहते आपल्याला दिसून येतात. फेसबूक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियाच्या मंचावर त्यांना अनेक जण फॉलो करतात. त्याना फॉलो करणाऱ्यांची संख्या ३ कोटींपेक्षा अधिक आहे.

बिग बी त्यांच्या चित्रपटांमध्ये व्यस्त असले तरी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या  माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. शिवाय 'चेहरे' आणि 'गुलाबो सिताबो' चित्रपटांमध्ये देखील बिग बी महत्त्वाची  भूमिका साकारणार आहेत