मी मुसलमान, पत्नी हिंदू आणि मुलं हिंदुस्तान - शाहरूख खान

 धर्माच्या बाबतीत त्यांनी केलेलं वक्तव्य सर्वांच्या पसंतीस पडत आहे.   

Updated: Jan 26, 2020, 05:30 PM IST
मी मुसलमान, पत्नी हिंदू आणि मुलं हिंदुस्तान - शाहरूख खान title=

मुंबई : अभिनेता शाहरूख खान सतत एखाद्या खास गोष्टी मुळे चर्चेत असतो. कधी चित्रपटाबद्दल, कधी सामाजिक कार्याबद्दल तर कधी त्याच्या वक्तव्यामुळे तो चर्चेत असतो. 'डान्स प्लस ५' या रियालिटी शोमध्ये त्याने हिंदू आणि मुसलमान धर्मा प्रती आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आहे. धर्माच्या बाबतीत त्यांनी केलेलं वक्तव्य सर्वांच्या पसंतीस पडत आहे.   
 
सध्या 'डान्स प्लस ५' या कार्यक्रमातील त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धर्मा संबंधित भाष्य करताना तो म्हणाला, 'मी मुसलमान, पत्नी हिंदू आणि मुलं हिंदूस्तान' असं वक्तव्य करत त्यांने जमलेल्या सर्व उपस्थितांची मने जिंकली. 

अनेकदा शाळेत फॉर्म भरावा लागतो, तेव्हा त्या फॉर्म मध्ये आपल्या धर्माचा उल्लेख देखील करावा लागतो. जेव्हा शाहरूखच्या मुलीला शाळेतून दिलेला फॉर्म भरावा लागला तेव्हा तिने शाहरूखला आपला धर्म कोणता प्रश्न विचारला?

तेव्हा शाहरूखने आपला धर्म 'इंडियन' आहे असं तिला सांगितलं. शिवाय शाळेतून दिलेल्या त्या फॉर्ममध्ये त्याने 'इंडियन' म्हणून धर्माचा उल्लेख केला. शाहरूख कायम प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून तो ते अमुल्य क्षण चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो.