नातीनं घातले असे कपडे, बिग बीसुद्धा पाहतच राहिले

अगळीवेगळी फॅशन ठिकंय, पण ती हे असं काही करेल याची त्यांनाही कल्पना नव्हती...   

Updated: May 11, 2022, 01:48 PM IST
नातीनं घातले असे कपडे, बिग बीसुद्धा पाहतच राहिले  title=

मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा अलीकडेच तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली. नव्या ही अमिताभ यांची लेक श्वेता यांची मुलगी आहे. नव्या लाईमलाईटपासून दुर राहण्याचा प्रयत्न करत असली तरी, सोशल मीडियावर नव्या कायम सक्रिय असते. नव्याचं राहणीमान अतिशय साध असलं तरी, तिच्या साधेपणाकडे सर्वांच्या नजरा असतात. आता देखील एका फोटोमुळे नव्या चर्चेत आली आहे. महत्त्वाचं म्हणजे तिच्या फोटोवर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील कमेंट केली आहे. 

नव्याने पांढऱ्या रंगाचा टि-शर्ट घालून एक फोटो शेअर केला आहे. नव्याच्या टि-शर्टवर 'क-से कंसेंट...' असं लिहिलं आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने  'क-से कंसेंट...' असचं कॅप्शन दिलं आहे. 

नव्या टी-शर्टच्या माध्यमातून एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलं आहे.  कोणत्याही नात्यात 'कंसेंट...' समोरच्याची मंजूरी महत्त्वाची आहे... विशेष म्हणजे प्रेम संबंधात 'कंसेंट...' अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 

नव्या पोस्टवर तिची आई श्वेता बच्चनने 'क्यूट' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अभिषेक बच्चनने भाचीला 'ब्यूटी' म्हणून कमेंट केलं आहे. तिच्या फोटोवर बिग बींनी 'कूल' अशी प्रतिक्रिया दिली आहे.