'एकाच इंडस्ट्रीत आहोत म्हणून गळ्यात गळे...' सईसोबतच्या मैत्रीवर प्रश्न विचारताच चंद्रा काय म्हणाली

Sai Tamhankar and Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर ही फारच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यातून अमृता खानविलकरनं यावेळी आपल्या आणि सईच्या नात्यावर भाष्य केले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 30, 2023, 03:56 PM IST
'एकाच इंडस्ट्रीत आहोत म्हणून गळ्यात गळे...' सईसोबतच्या मैत्रीवर प्रश्न विचारताच चंद्रा काय म्हणाली  title=
amruta khanvikar speaks about her relationship with sai tamhankar in khupte tithe gupte

Sai Tamhankar and Amruta Khanvilkar: मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या मैत्रीबद्दल अनेकदा चर्चा सुरू असते. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या मैत्रीबद्दलही अनेकदा चर्चा रंगलेली असते. परंतु एकमेकींशी स्पर्धा न करता या अभिनेत्री एकाच इंडस्ट्रीत गुण्यागोविंदानं नांदताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगलेली दिसते. मागील वर्षी तिचा 'चंद्रमुखी' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यानंतर तिची चर्चा रंगली होती. नुकतीच तिनं 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातून हजेरी लावली होती. यावेळी तिनं अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. यावेळी अवधुत गुप्तेनं तिला सई ताम्हणकरबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर तिनं उत्तर दिलं आहे ज्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

सई ताम्हणकर ही आपल्या अभिनयानं सर्वांची मनंजिंकून घेते आहे. त्यातून तिनं फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतूनही चांगली कामगिरी केली आहे. तिच्या नुकत्याच 'मिमी' या चित्रपटातील क्रिती सनन हिच्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यासाठी या चित्रपटाच्या संपुर्ण टीमनं जंगी सेलिब्रेशन केले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी सईनं या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे सईचीही सोशल मीडियावर चर्चा होती. यावेळी क्रिती सनन, सई ताम्हणकर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि या चित्रपटाची संपुर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. सईनंही या चित्रपटातून लक्षवेधी भुमिका केली आहे आणि सोबतच तिच्या या भुमिकेसाठी तिला आयफा अवोर्डही मिळाले होते. 

हेही वाचा : जय माता दी! शाहरूखची पावलं वैष्णोव देवीकडे...

'खुपते तिथे गुप्ते' ही मालिका सध्या सर्वत्र गाजते आहे. त्याचसोबत या मालिकेची सोशल मीडियावरही जोरात चर्चा रंगलेली असते. या शोमधून अनेक लोकप्रिय कलाकारानी हजेरी लावली आहे. सोबतच अनेक राजकारण्यांनीही यावेळी हजेरी लावली होती. यंदा अभिनेत्री अमृता खानविलकरही हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या एका सेगमेंटमध्ये अवधूतनं अमृताला सई ताम्हणकरचा फोटो दाखवला आणि तिच्याबद्दल काय वाटतं असं तिला विचारलं. 

त्यावेळी ती म्हणाली की, ''सई ताम्हणकर एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. असं अनेकदा झालं आहे की मी तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला. पण मला समोरून तसा प्रतिसाद मिळाला नाही.'' अमृता आपलं बोलणं संपवतेय तोच अवधुत गुप्ते पुढे विचारतो की, ''काही भांडण वैगरे झालं होतं का?'' त्यावर ती म्हणते की, ''नाही नाही, अजिबात नाही. आता आपण एका इंडस्ट्रीत काम करतो पण म्हणून आपण अगदीच सगळ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतो असंही नाही'', असं उत्तर तिनं दिलं.