... म्हणून आमृता खानविलकरच्या आईने लावला डोक्याला हात

आईच्या जीवाला घोर लावणारा अमृताचा जीवघेणा स्टंट  

Updated: Feb 29, 2020, 12:12 PM IST
... म्हणून आमृता खानविलकरच्या आईने लावला डोक्याला हात

मुंबई : मराठी कलाविश्वाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता खानविलकरने चाहत्यांच्या मनात एक वेगळी छाप उमटवली आहे. मराठी शिवाय तिने बॉलिवूडमध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे. आता ती 'खतरों के खिलाडी' १०च्या पर्वात सहभाही झाली आहे. या शोमध्ये ती अनेक भयानक स्टंट करताना दिसत आहे. या शोमध्ये सहभागी होणारी अमृता ही मराठी कलाविश्वातील पहिली अभिनेत्री आहे. 

सध्या अमृताचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमृताचा जीवघेणा स्टंट पाहून तिच्या आईने डोक्याला हात लावला आहे. सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. अमृताने तिच्या आईचे चेहऱ्यावरील भाव व्हिडीओमध्ये कैद केले असून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

'मी माझ्या आयुष्यात असं काही भयानक करेल असा कधी विचार देखील केला नव्हता. माझा हा स्टंट पाहून आईच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते पाहून नक्कीच तिला माझा अभिमान वाटत असेल.' हा व्हिडिओ अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. 

या स्टंटमध्ये तिच्यासोबत धर्मेश देखील होता त्यामुळे अमृताने त्याचे देखील आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी अमृताचा 'चोरीचा मामला' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मराठी शिवाय अमृताने राझी, मलंग या बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकरल्या आहेत.