Aryan Khan ड्रग्स प्रकरणाला नवं वळण, अनन्या पांडेची बेस्ट फ्रेण्ड ही त्याच क्रुझवर?

 या क्रुझवर आर्यन खानला त्याच्या मित्रमंडळीसोबत NCB ने अटक केली.

Updated: Oct 21, 2021, 03:17 PM IST
Aryan Khan ड्रग्स प्रकरणाला नवं वळण, अनन्या पांडेची बेस्ट फ्रेण्ड ही त्याच क्रुझवर?

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला  2 ऑक्टोबर रोजी ड्रग्स प्रकरणात गोव्याकडे जाणाऱ्या क्रुझवर अटक करण्यात आली. या क्रुझवर आर्यन खानला त्याच्या मित्रमंडळीसोबत NCB ने अटक केली. या सगळ्यांची रेव्ह पार्टी सुरु होती. 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवी माहिती पुढे आली आहे. अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या वांद्रे येथील घरावर NCBने छापा मारला आहे. अनन्या हिच्या पाली हिल येथील निवासस्थानी शोधमोहीम राबवली गेली. यावेळी काही वस्तू NCBच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. 

त्यामुळे सध्या बॉलिवूड मधील ही दोन मोठी नाव सतत चर्चेत आहेत. त्यात आता आणखी एका सेलिब्रिटी किडच नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे. आर्यन खानचा क्रुझवरील एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेता अनिल कपूर याच्या भावाची मुलगी आर्यनसोबत दिसत आहे. अभिनेता संजय कपूर यांची लेक शनाया कपूर ही सुहाना खान आणि अनन्या पांडे यांची चांगली मैत्रीण आहे.

आर्यन आणि शनाया कपूर यांचा हा फोटो सगळ्याचच लक्षवेधून घेत आहे. आर्यनला NCB ने अटक केली असताना त्याने या फोटोत दिसत असलेलं आऊटफिट घातलं होतं. 
पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टवर त्याने लाल शर्ट घातलं होतं. त्यामुळे हा फोटो त्याच वेळचा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आर्यन आणि अनन्याची बेस्ट फ्रेण्ड यांची ही चर्चा आता रंगताना दिसत आहे.