12 वी पास अनन्या पांडेला पार्ट्यांचं वेड; NCBच्या छाप्यानंतर फोटो समोर

 कोट्यवधींमध्ये कमवते,राहते आलिशान घरात आणि जगते शाही आयुष्य... 

Updated: Oct 21, 2021, 02:34 PM IST
12 वी पास अनन्या पांडेला पार्ट्यांचं वेड; NCBच्या छाप्यानंतर फोटो समोर

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर आता अभिनेत्री अनन्या पांडे देखील एनसीबीच्या रडारवर आहे. तिच्या घरी देखील एनसीबीने छापा टाकला आहे. ड्रग्स संदर्भात आर्यन खानसोबत एका व्हॉट्सऍप चॅटमध्ये अनन्याचं नाव समोर आले आहे. अनन्याने फार कमी वेळात  बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं आहे. अनन्या कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता ती फार मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 

Ananya Panday Party Mode

आर्यन आणि अनन्या चांगले मित्र असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र पार्ट्यांमध्ये  पार्ट्यांमध्ये जाताना दिसते. ती स्टारकिडसोबत प्रत्येक पार्टीमध्ये मजा करताना दिसते. अनन्या पार्ट्यांमध्ये आल्यानंतर पार्टीला एक वेगळी दिशा मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. एनसीबीच्या कारवाईनंतर आता अनन्याच्या पार्ट्यांमधील फोटो समोर आले आहेत. 

Ananya Panday Dressing Sense

अनन्या फक्त आर्यनची नाही तर त्याची बहिण सुहाना खानची देखील चांगली मैत्रीण आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आहेत. एवढंच नाही तर दोघींना अनेक ठिकाणी स्पॉट देखील केलं जातं. अनन्याला नाईट पार्ट्या फार आवडतात. आता एनसीबीच्या तपासानंतर काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ananya Panday Party With Starkid

अनन्याबद्दल सांगायचं झालं तर ती अभिनेता चंकी पांडेचा मुलगी आहे. अनन्याने 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांचं हवंतसं  मनोरंजन करू शकला नाही.