close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

करणच्या 'स्टुडंट...'ला क्लबमध्ये नो एन्ट्री

करणच्या 'स्टुडंट...'ला क्लबमध्ये जाण्यापासून रोखले आहे. 

Updated: Jun 5, 2019, 03:05 PM IST
करणच्या 'स्टुडंट...'ला क्लबमध्ये नो एन्ट्री

मुंबई : 'स्टुडंट ऑफ इअर २' चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या करणच्या 'स्टुडंट...'ला क्लबमध्ये जाण्यापासून रोखले आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिला क्लबमध्ये जाण्यापासून रोखले आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, मुंबईतील लोअर परेल येथील एका क्लबमध्ये जाण्यापासून अनन्याला अडवण्यात आले आहे. या क्लबमध्ये जाण्यासाठी २४ वर्ष आणि त्यावरील लोकांना प्रवेश आहे. अनन्याचे वय सध्या फक्त २० वर्ष असल्यामुळे तिला क्लबमध्ये एन्ट्री मिळाली नाही.

'स्टुडंट ऑफ इअर २' चित्रपटाच्या माध्यमातून अनन्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर ती आता 'पती पत्नी और वो' चित्रपटात झळकणार आहे. अनन्याशिवाय या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.