बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची

Updated: May 26, 2022, 06:39 PM IST
बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday title=

मुंबई : सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची. ज्यामध्ये बॉलिवूडचे सगळे स्टार्स दिसले. ही पार्टी सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी केवळ पार्टीबाहेरच नाही तर या बर्थडे बॅशच्या आतील व्हिडिओज देखील समोर येत आहेत. आता पार्टीत पोहोचलेल्या एका सुंदर अभिनेत्रीच्या चर्चा खूप रंगत आहेत आणि ही अभिनेत्री  दुसरी कोणी नसून अनन्या पांडे आहे.

अनन्या बॅकलेस ड्रेस घालून आली होती
अनन्या पांडे या पार्टीत बॅकलेस ड्रेस परिधान करून पोहोचली ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून त्याचवेळी अनन्या पांडेच्या या स्टाइलला खूप पसंती दिली जात आहे.

या पार्टीत प्रत्येक अभिनेत्री  खास पद्धतीने पोहोचली आणि आता बॉलिवूड सेलिब्रिटींचा लूक प्रकाशझोतात आला आहे. केवळ अनन्या पांडेच नाही तर जान्हवी कपूरपासून ते रश्मिका मंदान्नापर्यंत या पार्टीतील त्यांच्या लूकसाठी खूप चर्चेत आहेत. या पार्टीत अनन्या पांडे बॅकलेस आउटफिटमध्ये दिसली, तर जान्हवी कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांनी थाई स्लिट गाऊनमध्ये धुमाकूळ घातला.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पार्टीत बॉलिवूडचे सर्व सेलेब्स सहभागी झाले होते
करण जोहरच्या या पार्टीत ९० च्या दशकापासून ते आजपर्यंतचे स्टार्स दिसले. रवीना टंडन, राणी मुखर्जी, काजोल, ऐश्वर्या राय, करीना कपूर, मलायका अरोरा, अमृता सिंग, गौरी खान, आर्यन खान, जान्हवी कपूर, सारा अली खान, इब्राहिम, कियारा अडवाणी, वरुण धवन या पार्टीचा भाग बनले.