विराट कोहली आउट होताच 'हा' लोकप्रिय अभिनेता सोडायचा जेवण; आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

Virat Kohli : या लोकप्रिय अभिनेत्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की विराट कोहली आऊट झाला की ते जेवत नाहीत.

दिक्षा पाटील | Updated: Jan 3, 2025, 04:47 PM IST
विराट कोहली आउट होताच 'हा' लोकप्रिय अभिनेता सोडायचा जेवण; आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Nana Patekar-Virat Kohli : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचा आवडता क्रिकेटपटू हा विराट कोहली असल्याचं सांगितलं. त्याशिवाय त्यांनी हे देखील सांगितलं की जर तो आउट झाला तर त्याची भूक देखील मरून जाते आणि ते जेवतच नाही. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी मजेशीर मीम आणि रिअॅक्शन देताना दिसले. विराट कोहलीच्या चाहत्यांनी नाना पाटेकरांशी रिलेट केलं आणि सांगितलं की त्यांच्यासोबतही असंच काहीसं होईल. 

खरंतर, भारत आणि ऑस्ट्रेलियात पाच टेस्ट मॅचची सीरिजचा अखेरचा सामना असून तो सिडनीमध्ये होणार आहे. संपूर्ण भारताला विराट कोहलीकडून अपेक्षा होती की तो खूप रन करणारा. पण असं झालं नाही आणि तो आउट झाला. त्यानंतर नाना पाटेकर यांचे मीम्स व्हायरल होऊ लागले आणि नेटकरी ही आशा करु लागले की विराट आऊट झाल्यानंतर नाना पाटेकरांनी जेवण केलं असेल का? काही नेटकऱ्यांनी सल्ला दिला की नाना पाटेकर यांनी विराट कोहली मैदानात उतरण्या आधी जेवायला हवं.
 
नाना पाटेकर यांनी TV9 ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की 'विराट एक असा खेळाडू आहे. ज्याचा मी मोठा चाहता आहे. जर विराट आऊट झाला तर माझी भूक मरते. काही खाण्याची इच्छा राहत नाही.' नाना पाटेकर यांनी केलेल्या या कमेंटनं सगळ्या क्रिकेट प्रेमींना भावूक केलं आणि त्यांनी विराटची स्तुती केली. नक्कीच विराट कोहली हा मैदानावर नाही तर लाखो क्रिकेट प्रेमींच्या मनावर राज्य करतोय. फक्त ऑन फिल्ड नाही तर ऑफ फिल्ड देखील त्याती एक वेगळीच क्रेझ आहे. 

नाना पाटेकर यांनी विराट कोहलीविषयी जे वक्तव्य केलं त्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर केले. त्यात एक मीम असं होतं की ज्यात त्यांनी म्हटलं होतं की 'काय करू या भूकेचं? काही खाऊ पण नाही शकत. विराटवर प्रेम जे करतो.'

हेही वाचा : महाभारता संबंधीत असलेल्या 12 लाख 50 हजारसाठी असलेल्या 'या' प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

नाना पाटेकर यांच्या कामा विषयी बोलायचं झालं तर ते डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वनवास' मध्ये दिसले. आता ते लवकरच 'हाउसफुल 5' मध्ये दिसणार आहेत.