अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचं हे कृत्य कॅमेरात कैद; फोटो व्हायरल

बॉलिवूड स्टार अनन्या पांडेला इंडस्ट्रीत येऊन काही वर्षे झाली आहेत.

Updated: Oct 20, 2022, 06:43 PM IST
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचं हे कृत्य कॅमेरात कैद; फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड स्टार अनन्या पांडेला इंडस्ट्रीत येऊन काही वर्षे झाली आहेत. अभिनेत्रीने आतापर्यंत सुमारे 3-4 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  अभिनेत्रीच्या कामापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्य अधिक चर्चेत असतं. अभिनेत्री अनन्या पांडेच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्याही अनेकदा समोर आल्या आहेत. आता अलीकडेच अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं जात आहे.

चित्रपट निर्माता करण जोहरने हा खुलासा केला होता की, जेव्हा अभिनेत्री त्याच्या 'कॉफी विथ करण 7' या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान करण जोहरने अनन्या पांडेला स्पष्टपणे विचारलं होतं की, तिचं आणि आदित्य रॉय कपूरमध्ये काय चाललं आहे. कारण त्या दोघांना एका पार्टीत तासनतास एका कोपऱ्यात गप्पा मारताना पाहिलं होतं.

करण जोहरच्या या प्रश्नावर अभिनेत्री अनन्या पांडेला धक्काच बसला होता. तेव्हापासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात काहितरी शिजत आहे असा अंदाज सगळ्यांनी अंदाज बांधला होता. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता अनन्या पांडे आणि चित्रपट स्टार आदित्य रॉय कपूर यांनी चित्रपट निर्माता रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.

या पार्टीत अनेक स्टार्सही पोहोचले होते. या स्टार्सचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यातील एका फोटोच्या पार्श्वभूमीवर अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एका कोपऱ्यात गुपचूप गप्पा मारताना दिसत आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनन्या पांडे इशान खट्टरला डेट करत होती
अनन्या पांडे अभिनेता ईशान खट्टरला बऱ्याच दिवसांपासून डेट करत होती. नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर अभिनेता विजय देवरकोंडासोबत अभिनेत्रीच्या लिंकअपची बातमी खूप व्हायरल झाली. आता या अभिनेत्रीचं नाव आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं जात आहे.