ऑस्कर लायब्ररीचा भाग बनणार अनिल कपूर-सोनम कपूरचा 'हा' सिनमा

सिनेमाच्या स्क्रिनप्लेला अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स आणि सायन्स लायब्ररीचा भाग बनवण्यात आला आहे.

Updated: Feb 8, 2019, 11:17 AM IST
ऑस्कर लायब्ररीचा भाग बनणार अनिल कपूर-सोनम कपूरचा 'हा' सिनमा title=

मुंबई: दिग्दर्शक शैली चोप्रा दिग्दर्शित 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' सिनेमाला प्रेक्षक त्याचप्रमाणे समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रीया येत आहेत. शैली यांचा हा पहिला सिनेमा असून सिनेमात अभिनेता अनिल कपूर आणि सोनम कपूर एकत्र झळकत आहेत. सिनेमाच्या संबंधित एक खास बातमी समोर आली आहे ती म्हणजे,  सिनेमाच्या स्क्रिनप्लेला अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स आणि सायन्स लायब्ररीचा भाग बनवण्यात आला आहे. आजपर्यंत कधीही अशी कथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता आलेली नाही. २०१९ मधील सर्वात वेगळी सिनेमाची कथा असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It's the day to accept love for what it truly is. #SetLoveFree with #EkLadkiKoDekhaTohAisaLaga at a theatre near you. Link in bio

A post shared by SonamKAhuja (@sonamkapoor) on

 

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना मान्याता दिली आहे. 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' सिनेमा समलैंगिक संबंधांवर आधारित असून सिनेमात अनिल कपूर आणि सोनम कपूर वडील-मुलीची भूमिका साकारताना दिसत आहेत.  सिनेमात जूही चावला मुख्य भूमिका बजावताना दिसत आहे. सोशल मीडियावर सिनेमाला चाहत्यांकडून चांगलीच दाद मिळत आहे. विशेष: सोनमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिनेमात सोनामने लेस्बियनची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या कथेला समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रीया मिळाल्या असल्या तरीही बॉक्सऑफिसवर मात्र सिनेमा अपयशी ठरला आहे. 

अनिल कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनम कपूरचे कौतुक केले. त्यांनी इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.  पोस्टमध्ये सोनमवर गर्व  असल्याचे त्यांनी सांगितले होते. सिनेमाची निर्मिती विधु विनोद चोप्रा यांनी केली आहे. याआधी राजकुमार हिरनी यांच्या 'संजू' या सिनेमाच्या कथेला कथेला सुद्धा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स आणि सायन्स लायब्ररीमध्ये पाठवण्यात आले होते.