Pushpa 2 Box Office Collection Day 18: 18 दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. 'पुष्पा 2' चित्रपटाने आजचा दिवस म्हणजेच 22 डिसेंबर रोजी इतिहास रचला आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाने 18 व्या दिवशी देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'बाहुबली 2' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडल्यानंतर या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे.
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन
सैक्निल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने 4 डिसेंबर रोजी प्रीमियरमधून 10.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईमध्ये दररोज वाढ होत गेली. ज्यामध्ये या चित्रपटाने 18 व्या दिवशी दुपारी 3.25 पर्यंत एकूण 1043.95 कोटींची कमाई केली.
'पुष्पा 2'ने मोडला 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड
'पुष्पा 2' चित्रपटाने 17 व्या दिवशी 1029.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत प्रभासचा 'बाहुबली 2' 1030.42 कोटींची कमाई करून पहिल्या क्रमांकावर होता. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाला फक्त 52 लाखांची कमाई करून 'बाहुबली 2' चित्रपटाला मागे टाकायचे होते आणि आज 'पुष्पा 2' चित्रपटाने ते केले आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. चित्रपटाची कमाई अजूनही सुरुच आहे. भारतातील पहिला चित्रपट 1913 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 'पुष्पा 2' ने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईचा आकडा आजपर्यंत कोणीही गाठू शकले नाही.
चाहत्यांना 'पुष्पा 3' ची उत्सुकता
'पुष्पा 2' चित्रपटाच्या शेवटी, 'पुष्पा 3' शी संबंधित एक इशारा देण्यात आला आहे. याचाच अर्थ असा होती की, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल येत्या काही वर्षांमध्ये पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहेत. तथापि, 'पुष्पा 3' चित्रपटासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
PHI
(20 ov) 201/9
|
VS |
MAS
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.