Anil Kapoor मुळे फोटोग्राफर्सची दिवाळीची बनली आणखीन स्पेशल

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, सुखाचा आणि आनंदाचा सण. 

Updated: Nov 5, 2021, 07:11 PM IST
Anil Kapoor मुळे फोटोग्राफर्सची दिवाळीची बनली आणखीन स्पेशल title=

मुंबई : दिवाळी म्हणजे दिव्यांचा, सुखाचा आणि आनंदाचा सण. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दिवाळी सण साजरा करण्यावर निर्बंध होते. पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आणि देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. गरीबांपासून श्रीमंतापर्यंत आनंदाचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी ही यंदा दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली. बच्चन कुटुंबापासून ते कपूर कुटुंबापर्यंत सर्वांनीच दिवाळीच जंगी सेलिब्रेशन केलं. बच्चन कुटुंबापासून कपूर कुटुंबापर्यंत दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बच्चन कुटुंबाने एकत्र लक्ष्मीपूजन केलं.

तर बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झासाठी ही दिवाळी खास ठरलीये. यावर्षी तिने वैभव रेखीसोबत लग्न केले आणि ती एका मुलाची आई देखील झाली. 

स्वत:च्या कुटुंबासह इतरांची दिवाळी देखील खास करण्याचा यंदा काही बॉलिवूड स्टार्सने पर्यंत केला. बॉलिवूडचा लखन अभिनेता अनिल कपूर यांनी सगळ्या फोटोग्राफर्सना मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपली परंपरा जपत त्यांनी यावेळी ही सगळ्यांना दिवाळीची भेट दिली. यंदा अनिल कपूर यांच्यासाठी ही दिवाळी खास आहे, कारण नुकतच रेहा कपूर हीच लग्न पार पडलं. तिची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे.

अनिल कपूर यांचा मुंबईतील बंगला सजवण्यात आला होता. आणि आलेल्या सगळ्या पाहुण्याचे स्वागत आणि मानपान कपुर कुटुंबाकडे मोठ्या उत्साहात करण्यात आलं.