चित्रपटाचे व्यावसायिक यश अधिक महत्त्वाचे - अनिल कपूर

अनिल कपूर सध्या त्यांच्या नवीन लुक आणि फिटनेसमुळे चर्चेत आहेत.

Updated: Mar 20, 2019, 07:34 PM IST
चित्रपटाचे व्यावसायिक यश अधिक महत्त्वाचे - अनिल कपूर title=

मुंबई : २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'टोटल धमाल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाचा गल्ला जमवला. अभिनेता अनिल कपूर 'टोटल धमाल'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे, चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद व्यक्त करत आहेत. चित्रपटाला व्यावसायिक यश मिळणे अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचं अनिल कपूर यांनी म्हटलंय. अनिल यांनी चित्रपटासाठी प्रत्येक प्रकारचं यश महत्त्वपूर्ण आहे. 'टोटल धमाल' चित्रपटाला संपूर्ण यश मिळालं आहे.  याचा अर्थ चित्रपट व्यापक स्वरूपात लोकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी झाल्याचं अनिल कपूर यांनी म्हटलंय. परंतु माझ्यासाठी चित्रपटाचं व्यावसायिक यश अधिक संतुष्टीदायक असल्याचं अनिल कपूर यांनी म्हटलंय.

'टोटल धमाल' आधी वर्षाच्या सुरूवातीलाच अनिल कपूर यांनी 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारली होती. अनिल कपूर यांनी चित्रपट निवडण्याच्या प्रक्रियेबाबत बोलताना सांगितलं की, मी कोणताही प्रोजेक्ट संपूर्ण मन लावून केला तर मी त्यात पुढे जातो, त्या प्रोजेक्टमध्ये मी यशस्वी होतो. असं त्यांनी म्हटलंय. भारतात १५० करोड रूपयांहून अधिक कमाई केलेल्या 'टोटल धमाल' चित्रपटाच्या यशानंतर अनिल कपूर यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

BOX OFFICE: पहले वीकेंड में 'टोटल धमाल' का हंगामा, बटोर लिए इतने करोड़

इंद्र कुमार दिग्दर्शित 'टोटल धमाल' चित्रपट 'धमाल' चित्रपटाचा तीसरा भाग आहे. 'धमाल' चित्रपटात अरशद वारसी, जावेद जाफरी आणि रितेश देशमुख, संजय दत्त यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.