मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सिनेमा अॅनिमल हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या सगळीकडे अॅनिमलचा बोलबाला आहे. कलेक्शनच्या बाबतीत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स मोडत आहे. सिनेमाला मिळत असलेल्या रिएक्शनमुळे सिनेमाचे मेकर्स सध्या खूप खुश आहेत. मात्र या सगळ्या दरम्यान अजून एका चर्चेने जोर धरला आहे. ते म्हणजे रणबीरच्या शरीरयष्टीने. आता दरम्यान, रणबीर कपूरच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीरचं सुटलेलं पोट आणि वाढलेल्या वजनासह दिसत आहे.
आता दरम्यान, रणबीर कपूरच्या परिवर्तनाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर जाड पोट आणि वाढलेल्या वजनासह दिसत आहे. खरंतर सिनेमात रणबीर एका सीनमध्ये खूप जाड दिसत आहे. याचबरोबर त्याचं पोटंही सुटलेलं दिसत आहे. रणबीरचं वजनही खूप वाढलेलं दिसत आहे. पुर्ण सिनेमात त्याला फिट आणि फुल एक्शनसोबत दिसत आहे. त्याच्या या सीनमध्ये त्याला बघून त्याचे चाहतेही प्रचंड हैराण होत आहेत. यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला की, एवढ्या लगेजच वजन कमी करून रणबीरने या भूमिकेसाठी स्वतःला कसं तयार केलं? जर तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.
आता रणबीरच्या या जादूचा खुलासाही झाला आहे. खरं तर, आपल्याला रणबीर एका सीनमध्ये सुटलेल्या पोटात दिसला याचबरोबर त्याचं वजन वाढल्याचं दाखवण्यात आलं आहे. खरंतर प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीने त्याची शरीरयष्टी बदलण्यात आली होती. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये कलाकार प्रोस्थेटिक्सच्या माध्यमातून रणबीरची बनावट बॉडी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे रणबीरचं वाढलेलं वजन किंवा सुटलेलं पोट ही केवळ अफवा होती.
रणबीर कपूरचा अॅनिमल हा सिनेमा कमाईच्या बाबतीत नवीन रेकॉर्ड बनवलं आहे. या सिनेमात भली मोठी स्टार कास्ट आहे. रणबीरच्या पत्नीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसत आगे. तर अनिल कपूर रणबीरच्या कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमात ते आपल्या मुलाला गुन्हेगार मानताना दिसत आहे. तर तृप्ती डिमरी एका छोट्या भूमिकेत दिसेतेय पण सध्या सगळ्यात जास्त चर्चा तिच्याच भूमिकेची होताना पहायला मिळत आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.