बाळाला एक महिना होताच 'या' अभिनेत्रीला पु्न्हा डोहाळे

एक महिन्यापूर्वीच दिला होता मुलाला जन्म 

Updated: Mar 12, 2021, 11:12 AM IST
बाळाला एक महिना होताच 'या' अभिनेत्रीला पु्न्हा डोहाळे

मुंबई : दाम्पत्य पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर काही वर्षांचं प्लानिंग करतात. पहिल्याच बाळाला सगळं प्रेम देत दुसऱ्या बाळासाठी थांबण्याचा विचार करतात. मात्र छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पहिल्या बाळाच्या जन्माला महिना होत नाही तोच दुसऱ्या बाळाच्या तयारीला लागली आहे. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी खूप लोकप्रिय आहे. ती कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच अनिताने आपल्या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अनिता सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ती कायमच आपल्या मुलासोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तसेच आपल्या मॅटरनीटीचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिचा नवरा रोहित रेड्डी देखील आहे. हे फोटो शेअर करताना तिने जे म्हटलंय... त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

काय म्हटलंय तिने या पोस्टमध्ये..... 

दोघांनीही या फोटोत पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. “गरोदरपणातील माझ्या या पोटाची मला आठवण येत आहे. सध्या माझ्याकडे असे पोट नाही अशी गोष्ट नाही, पण हे एवढे गोंडस नाही. मी आताच दुसऱ्या बाळाच्या तयारीत आहे. रोहितने नुकतेच अनिताला अनफॉलो केले” अशा आशयाचे कॅप्शन अनिताने या फोटोला दिले आहे. अनिताचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

९ फेब्रुवारी रोजी अनिताने आरवला जन्म दिला. रोहित शेट्टीने इंस्टाग्रामवरून आपण बाबा झाल्याची गोड बातमी दिली होती. दोघांनीही या फोटोत पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.  एका फोटोमध्ये अनिता तर दुसऱ्या फोटोमध्ये फोनच्या स्क्रीनवर बाळाचा चेहरा दिसत होता. सोबतच आरवला १ महिना पुर्ण झाल्याने त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला होता.