पार्टीत अंकिता आणि विकी जैनचं लिपलॉक, रोमांटिक डान्स व्हायरल

अंकिता लोखंडेने शनिवारी तिच्या मैत्रिणींसोबत दिवाळी पार्टीला हजेरी लावली

Updated: Oct 31, 2021, 01:43 PM IST
पार्टीत अंकिता आणि विकी जैनचं लिपलॉक, रोमांटिक डान्स व्हायरल title=

मुंबई : अंकिता लोखंडेने शनिवारी तिच्या मैत्रिणींसोबत दिवाळी पार्टीला हजेरी लावली आणि आपल्या आयुष्यातील येणारा काळही पार्टीत घालवायचा असा निर्धार केला. अभिनेत्रीसोबत तिचा बॉयफ्रेंड विकी जैन देखील पार्टीत सहभागी झाला होता आणि दोघांनी एकत्र डान्स केला आणि सगळ्यांसमोर KISS ही केली. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

डान्स करत केलं KISS
अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तिने लाल साडी आणि नेकलेस घातला आहे. मोकळे सोडलेले तिचे केस खूप सुंदर दिसत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये ती विकी जैनसोबत डान्स करताना दिसत आहे. दोघंही डान्स करताना एकमेकांमध्ये हरवून जातात आणि KISS करता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

या शोमध्ये पाहिलं
अंकिता शेवटची पवित्र रिश्ता रिबूटमध्ये दिसली होती. तिने कंगना रानौत स्टारर 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात तिने कंगनाच्या मैत्रिणी झलकारीबाईची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती टायगर श्रॉफच्या 'बागी 3'मध्येही दिसली होती.