Good News : अभिनेत्री अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज

अंकिता लोखंडे ही टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री तर आहेच पण याचसोबतीने ती आता बॉलिवूड ध्ये आपल्या अभिनयाने वेगळी उंची गाठत आहे. मात्र अंकिताच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. 

Updated: Feb 13, 2024, 06:58 PM IST
Good News : अभिनेत्री अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज title=

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा अंकिता वादाच्या भोवऱ्यातही अडकली आहे. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अंकिता नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. अंकिताने एखादी पोस्ट शेअर करताच ती काहीच क्षणात व्हायरल होवू लागते. अंकिताच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच फार आवडतं. नुकतीच अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जी ऐकून तिच्या चाहत्यांनाही फार आनंद होईल यात काहीच शंका नाही.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अंकिता लोखंडे ही टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री तर आहेच पण याचसोबतीने ती आता बॉलिवूड ध्ये आपल्या अभिनयाने वेगळी उंची गाठत आहे. अलीकडेच अंकिता बिग बॉस 17 मध्ये एक प्रख्यात स्पर्धक म्हणून उत्तम खेळली आणि तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. स्वतःसाठी उभ राहून खेळून सगळ्यांना कायम ती तोडीस तोड देऊन खेळणारी अभिनेत्री ठरली प्रेक्षकांनी तिच्यावर अपार प्रेम केलं आणि  भारताला आवडत असलेल्या अनेक पात्रांपैकी एक Ormax चे एक पात्र ती बनली. 

अंकिता लोखंडे डिसेंबर 2023 मधील Ormax ची सर्वात लोकप्रिय नॉन फिक्शनल व्यक्तिमत्त्वांपैकी एक ठरली Ormax च्या अधिकृत सोशल मीडिया पेज ने ही पोस्ट शेअर केली. अंकिता कपिल शर्मा, मुनावर फारुकी, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांच्यासोबत यात दिसली आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिताच्या अफलातून खेळीने ती  आगामी चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकरच्या रिलीजसाठी सज्ज होत आहे. पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तिने अलीकडेच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली असून 22 मार्च 2024 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सध्या सर्व स्तरावरुन अंकिता लोखंडेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली आहे. अंकिता आणि विकी 'बिग बॉस 17'मध्ये दिसले होते. या जोडीन तिथे चांगलीच खळबळ माजवली होती.