छातीत दुखत असल्याने प्रसिद्ध अभिनेता रूग्णालयात अ‍ॅडमीट

Annu Kapoor Hospitalized :प्रसिद्ध अभिनेत्याला (Annu Kapoor) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.छातीत दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याला रूग्णालयात दाखल करताच त्यांना हार्ट अटॅक आल्याची चर्चा सुरु झाली होती. 

Updated: Jan 26, 2023, 09:22 PM IST
छातीत दुखत असल्याने प्रसिद्ध अभिनेता रूग्णालयात अ‍ॅडमीट

Annu Kapoor Hospitalized : प्रसिद्ध अभिनेत्याला (Annu Kapoor) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.छातीत दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याला रूग्णालयात दाखल करताच त्यांना हार्ट अटॅक आल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र या सर्व अफवा असल्याचे अभिनेत्याच्या मॅनेजरने स्पष्ट केले आहे. 

प्रसिद्ध अभिनेता आणि टीव्ही होस्ट अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना छातीत दुखू (Chest Pain) लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. 

डॉक्टर काय म्हणाले? 

अन्नू कपूर (Annu Kapoor) यांच्यावर सध्या गंगाराम रुग्णालयात उपचार सूरू आहेत. कपूर यांना छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कार्डिओलॉजीचे डॉक्टर सुशांत वट्टई त्यांच्यावर उपचार करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती सर गंगाराम हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अजय गर्ग यांनी दिलीय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अन्नू कपूर (Annu Kapoor)यांना छातीत दुखत होते. त्यामुळेच त्याना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आज म्हणजेच 26 जानेवारी गुरुवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता अन्नू कपूर बोलत आहेत आणि त्यांनी जेवणही केले आहे, अशी माहिती अन्नू कपूरचे मॅनेजर सचिन यांनी दिली. तसेच अन्नू कपूरच्या मॅनेजरनेही हृदयविकाराच्या झटक्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

दरम्यान अन्नू कपूर (Annu Kapoor)अभिनेता आयुष्मान खुराना स्टारर विकी डोनर आणि ड्रीम गर्ल मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने ऐश्वर्या राय बच्चन आणि अजय देवगण स्टारर रेनकोट आणि प्रियांका चोप्राच्या 7 खून माफ या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.