अर्जुन कपूरच्या बहिणीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली सावत्र आई श्रीदेवीशी तुलना, म्हणाले...

Anshula Kapoor Photo : अर्जुन कपूरची बहीण अंशुलानं नुकतचं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना तिची सावत्र आई श्रीदेवीची आठवण आली आहे. अंशुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट करत तिची स्तुती देखील केली आहे. 

Updated: Apr 23, 2023, 04:33 PM IST
अर्जुन कपूरच्या बहिणीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली सावत्र आई श्रीदेवीशी तुलना, म्हणाले... title=
(Photo Credit : Social Media)

Anshula Kapoor Photo : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहीण अंशुला (Anshula Kapoor) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अंशुला ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी अंशुला तिच्या वेट लूझ जर्नीमुळे चर्चेत होती. वजन कमी केल्यानंतर अंशुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अंशुला ही सध्या तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिची तुलना सावत्र आई श्रीदेवीशी केली आहे. (Sridevi)

अंशुलानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. अंशुलानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचे कुरळे केस हे लक्ष वेधी ठरले आहेत. अंशुलानं काळ्या रंगाचा ब्रालेस ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबत तिनं काळ्या रंगाची बुट देखील घातली आहेत. तिचा हा हटके लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. सध्या सोशल मीडियावर अंशूलाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर कॅप्शन देत अंशुला म्हणाली की स्वत: साठी एक नोट : जर तुम्हाला चांगल वाटत असेल तर तो ड्रेस परिधान करा. कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यासाठी आपलं आयुष्य हे खूप छोटं आहे. 

हेही वाचा : अक्षयची जबरा फॅन धडकली शाहरुखला, किंग खानचा केला मोठा अपमान तरी...

अंशुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तू श्रीदेवी यांच्यासारखी दिसते. त्याचं कारण तुझा गोल चेहरा आणि कुरळे केस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'व्वा अंशुला काय ट्रान्सफॉरमेशन आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुला या नव्या अवतारात पाहून आनंद झाला.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'खूप सुंदर दिसतेस. तुला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उस्तुक आहे.' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'लेडी क्रश.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अंशुला तू फक्त बाहेरून नाही तर आतुन देखील तितकीच सुंदर आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, '80 च्या दशकातील राणी आहे असं वाटतंय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'या फोटोत तू तुझ्या आईसारखी दिसतेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तू श्रीदेवी सारखी दिसतेस असं मला का वाटतंय.' 

दरम्यान, अंशुलानं अजून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नसलं तरी तिचे लाखो चाहते आहेत. अंशुलाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासी नेटकरी उत्सुक आहेत. अंशुलाचे इन्स्टाग्रामवर 646K फॉलोवर्स आहेत.