अनुपमा मालिकेतील अभिनेत्याचा अपघात, फोटो आला समोर

अनुपमा मालिकेतील अभिनेत्याचा अपघात, काय आहे या फोटोमागचं सत्य? 

Updated: Dec 5, 2021, 09:29 PM IST
अनुपमा मालिकेतील अभिनेत्याचा अपघात, फोटो आला समोर

मुंबई: TRP मध्ये सतत टॉपमध्ये असलेली सीरियल अनुपमामध्ये सर्वात मोठा ट्वीट येणार आहे. आता या सीरियलमध्ये अनुज आणि अनुपमाचं लग्न कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनुपमा सीरियल पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

प्रसिद्ध अभिनेता अनुज कपाडियाचा अपघात झाल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. अनुजला आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की अनुजचा भीषण अपघात झाला आहे. याचे 4 फोटो समोर आले आहेत. 

अनुजचा अपघात झाल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. तर अनुज लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनुपमा सीरियलमध्ये पुढच्या भागात अनुजचा अपघात झाल्याचे दाखवलं जाणार आहे. शिवाय अनुजची EX गर्लफ्रेंड त्याच्या आयुष्यात पुन्हा येते. 

या दोन गोष्टींमुळे अनुज आणि अनुपमाच्या नात्यात काय बदल होणार? इतकच नाही तर वनराज अनुपमाची रुग्णालयात अनुजसमोर माफी मागतो. मात्र ही माफी कशासाठी मागतो? याचं गुपितही उलगडणार आहे. 

वनराजने काव्याला घटस्फोटाचे पेपर दिले आहेत. आता काव्या त्यावर सही करणार का? वनराज अनुपमा पुन्हा एकत्र येणार का? आता चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या भागात मिळणार आहेत.