अमृता सिंगला या कारणामुळे मुलगी सारासोबत करायचं नाही काम

सारा अली खानने इंडस्ट्रीत तीन वर्षे पूर्ण केली आहेत. 

Updated: Dec 5, 2021, 08:59 PM IST
अमृता सिंगला या कारणामुळे मुलगी सारासोबत करायचं नाही काम

मुंबई : सारा अली खानने इंडस्ट्रीत तीन वर्षे पूर्ण केली आहेत. या तीन वर्षांत साराचे 4 चित्रपट प्रदर्शित झाले असून आता 'अतरंगी रे' हा पाचवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्याच्या प्रमोशनमध्ये सध्या सारा खूप व्यस्त आहे. यादरम्यान सारा अनेक मुलाखतीही देत ​​आहे.

नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत साराला तिची आई अमृता सिंगसोबत काम करण्याविषयी विचारण्यात आलं होतं. तेव्हा साराने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. साराने सांगितलं की, कदाचित तिची आई अमृता सिंगला तिच्यासोबत काम करायचं नसेल आणि तिने यामागचं जे कारण दिलं तेही आश्चर्यकारक होतं.

सारा अली खान म्हणाली, 'तिला वाटत नाही की, तिची आई तिच्यासोबत काम करू इच्छिते. कारण ती माझी आई आहे. शॉटच्यावेळी माझ्या चेहऱ्यावर केस आले आणि ती सेटवर असेल, तर ती लगेच म्हणेल कट आणि माझे केस व्यवस्थित करेल. कारण मी तिची मुलगी आहे आणि तिला मला बेस्ट पाहायचं आहे. मी तिला कधीही अशा परिस्थितीत टाकेन असं मला वाटत नाही.'  सारा आणि अमृता सिंग  आता चित्रपटात एकत्र दिसत नसले तरी त्यांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं आहे.