Afghanistan : त्यांनी मुलींना विकलं, महिलांना मारलं; माझ्या लोकांना वाचवा; अफगाणी दिग्दर्शिकेची आर्त हाक

अनेक मुलांचं अपहरण केलं. त्यांनी तालिबान्यांमध्येच मुलींची विक्री केली

Updated: Aug 16, 2021, 05:46 PM IST
Afghanistan : त्यांनी मुलींना विकलं, महिलांना मारलं; माझ्या लोकांना वाचवा; अफगाणी दिग्दर्शिकेची आर्त हाक   title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afganistan Crisis) सुरु असणारी अस्थिरता आणि विचलीत करणारी परिस्थिती सध्या साऱ्या जगापुढे अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. तालिबाननं अफगाण सरकारला नमवत मिळवलेलं वर्चस्व अनेक निकषांनाच हादरा देत आहे. त्यातच अफगाणिस्तानातील नागरिकांची आर्त हाक आता काळीज पिळवटून टाकत आहे. 

दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट आहे एका अफगाणी दिग्दर्शिकेची. जिनं देशातील भयावह परिस्थिती शब्दांत मांडत सर्वांच्या मदतीची अपेक्षा केली आहे. 

अफगाण दिग्दर्शिका आणि अफगाण चित्रपट संघटनेची पहिली महिला अध्यक्ष सारा करीमी हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक शेअर केलं. यामध्ये तिनं तेथील कलाविश्वाची तगमगही मांडली. 

Afghanistan मध्ये संघर्ष सुरु असतानाच समोर आली 'ती'; डोळे भरुन पाहा या अभिनेत्रीचं अफगाणी सौंदर्य  

पत्रकास कारण की.... 

'मागील काही आठवड्यांमध्ये तालिबाननं देशातील बऱ्याच भागांचा ताबा घेतला. त्यांनी आमच्या लोकांना मारलं, अनेक मुलांचं अपहरण केलं. त्यांनी तालिबान्यांमध्येच मुलींची विक्री केली, महिलांच्या वेशभूषेवरुन त्यांच्या हत्या केल्या.'

तुम्ही याविरोधात आवाज उठवा 
अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) सुरु असणाऱ्या या संघर्षाविरोधात इतरांनीही आवाज उठवण्याचं आवाहन केलं. 'माध्यमं, सरकार आणि जागतिक मानवतावादी संघटना या साऱ्यावर मौन बाळगून आहेत, जणू काही हा शांतता करार आहे. हे कधीही कायदेशीर नव्हतं. त्यांना ओळख देणं हेत त्यांना पुन्हा सत्तेत येण्यास मदत करत आहे. तालिबाननं आमच्या लोकांचा छळच केला आहे. माझ्या देशात दिग्दर्शिका होण्यासाठी म्हणून मी जितकी मेहनत घेतली होती, ते सारंकाही ढासळताना दिसत आहे', असं तिनं लिहिलं.

 

काबुलवर (Kabul) तालिबानचा (Taliban) ताबा येण्यापूर्वी लिहिलेल्या या पत्रकामध्ये सारानं मदतीसाठी कळवळीनं हाक मारली होती. सारं जर अफगाणिस्तानवर बहिष्कार टाकणार नाही, यासाठी आम्हाला मदत करा असं तिनं लिहिलं. भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी त्यांच्या परीनं करीमीची हाक सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.