close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रणवीरच्या 'गली बॉय'वर थिरकली आराध्या बच्चन

आराध्याच्या नृत्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Updated: May 19, 2019, 05:33 PM IST
रणवीरच्या 'गली बॉय'वर थिरकली आराध्या बच्चन

मुंबई : स्टार किड्समध्ये सर्वाधिक चर्चा असते ती म्हणजे सैफ आणि करिनाच्या क्यूट तैमूरची. 'सैफिना'चा मुलगा तैमूर सर्वांच्याच नजरा वेधून घेत असतो. पण सध्या बच्चन कुटुंबाची कन्या आराध्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आराध्याच्या नृत्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. तिच्या या नृत्य आविष्काराचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. काही तासांमध्ये या व्हिडिओला अधिक लोकप्रियता मिळत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २२ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#aradhyabachchan cool entry today for shiamakofficial #summerfunk25years viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

बॉलिवूडमध्ये सध्या 'कान' फेस्टिवलचे वारे वाहताना दिसत आहेत. 'कान'मध्ये उपस्थित राहण्याआधी ऐश्वर्या आराध्यासह प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक आणि कोरिओग्राफर शामक दावरच्या शोमध्ये उपस्थित होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#aradhyabachchan performance today for summerfunk show

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

श्यामक दावरने त्याच्या नृत्य अकॅडमी तर्फे 'समर फंक' शोचे आयोजन केले होते. शामकच्या या २५व्या कार्यक्रमामध्ये आराध्याने सुद्धा भाग घेतला होता.

शामकच्या कार्यक्रमात आराध्या रणवीर सिंगच्या 'गली बॉय' गाण्यावर थिरकताना दिसली. या कार्यक्रमात ऐश्वर्यासह अभिषेक बच्चन, वृदा राय, जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी सुद्धा त्यांच्या चिमुकलीचा नृत्य आविष्कार पाहाण्यासाठी हाजेरी लावली होती.