...म्हणून वडिलांनीच मुलासाठी बघितलेल्या मुलीशी पळून जाऊन केलं लग्न; नाशिककर तरुण झाला संन्याशी

Nashik Shocking News: वडील आणि मुलाच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकणारी ही बातमी नाशिकमधून समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 7, 2025, 12:59 PM IST
...म्हणून वडिलांनीच मुलासाठी बघितलेल्या मुलीशी पळून जाऊन केलं लग्न; नाशिककर तरुण झाला संन्याशी title=
नाशिकमधील धक्कादायक प्रकार (प्रातिनिधिक फोटो)

Nashik Shocking News: सध्याचा काळ असा आहे की, मुलाला मुलगी भेटणे अवघड झाले आहे. त्यासाठी आता वधू-वर मेळाव्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. परंतु तेथेही मुलांच्या पदरी निराशाच पडते. अनेकदा मुलांचे वय निघून जाते व त्यांना लग्न जुळत नसल्याने मानसिक तणावाला समोर जावं लागतं. त्यांच्या जीवनात अशा काही घटना घडतात की आयुष्यभर त्यांच्यावर एकटं राहण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार नाशिकमधील एका तरुणाबरोबर घडला आहे.

कुठे घडला हा प्रकार?

नाशिकमधील सिडको परिसरातील एका युवकाबरोबर फारच विचित्र घटना घडली आहे. ही घटना समाजिक संवेदनांना हादरवणारी असल्याची पंचक्रोषीत चर्चा आहे. या घटनेने फक्त एका कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. ही घटना सध्या चर्चेत असून या तरुणाने तिच्याबरोबर संसार रंगवण्याची स्वप्न पाहिली आता तीच आई म्हणून त्याच्या घरी आली आहे.

नक्की घडलं काय?

सिडकोतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा युवक आपल्या वडिलांसोबत राहतो. मेहनतीने तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. युवकाचे वय लग्नाला योग्य झाले असल्याने त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी अनुरूप वधू शोधण्यास सुरुवात केली. काही काळानंतर एका कुटुंबाशी संबंध जुळले आणि मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मुलगा आणि मुलीने एकमेकांना पसंत केले. लग्नाची तारीखही निश्चित झाली. लग्न ठरल्याने दोन्ही कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबांत भेटीगाठी होऊ लागल्या. वधू आणि वराच्या कुटुंबीयांमधील संबंध अधिक गोड होत गेले. मात्र, याच भेटीगाठी दरम्यान युवकाच्या वडिलांनी होणाऱ्या वधूकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनाने पाहायला सुरुवात केली. त्यांच्या मनात त्या मुलीविषयी आकर्षण निर्माण झाले

तरुण नैराश्येत गेला

थोड्याच कालावधीत युवकाच्या वडिलांनी आपल्या स्वार्थी भावनांना आळा न घालता त्या मुलीशी गुपचूप लग्न केले. त्यांनी पळून जाऊन हा निर्णय घेतल्याने संपूर्ण कुटुंबात आणि समाजात खळबळ उडाली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चेचा विषय बनली. युवकाला या प्रकारामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. वडिलांच्या या वर्तनामुळे तो नैराश्येच्या गर्तेत ढकलला गेला आहे.

संन्यासी जीवन

आपल्या वडिलांनी केलेल्या या कृत्याने खचलेल्या युवकाने संसार, कुटुंब, आणि सामाजिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्वस्व सोडून संन्यासी जीवन स्वीकारले आहे. आजही हा युवक सिडको परिसरात कधीतरी एकटाच दिसून येतो. या तरुणाबद्दल स्थानिक लोकांमध्ये सहानुभूती आहे. मात्र या अनोख्या प्रेम कहाणीची सर्वत्र चर्चा आहे.

स्थानिकांमध्ये चर्चा

सिडकोतील ही घटना नात्यांमधील विश्वास, स्वार्थ, आणि नातेसंबंधांच्या मूलभूत तत्त्वांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. या घटनेमुळे युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. वडिलांच्या अशा वागण्याने केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर एका संपूर्ण कुटुंबाबद्दल नको त्या चर्चा लोकांमध्ये आहेत. सध्या स्थानिक लोक या युवकाबद्दल चर्चा करताना दिसतात. स्वार्थी निर्णयाचा कुटुंबावर कसा विपरीत परिणाम करू शकतो, याचं हे जीवंत उदाहरण आहे.