सट्टा लावण्याच्या सवयीमुळे अरबाज-मलाईकाचा घटस्फोट

अरबाज खान अडचणीत

Updated: Jun 2, 2018, 02:11 PM IST
सट्टा लावण्याच्या सवयीमुळे अरबाज-मलाईकाचा घटस्फोट

मुंबई : बॉलिवूडा सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या अडचणीत सापडला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आयपीएलमध्ये सट्टा लावल्याची गोष्ट त्याने कबूल केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अरबाज खानने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. सट्टेबाज सोनू जालानला देखील ओळखत असल्याचं त्याने म्हटलं आहे. सट्टा लावण्याच्या सवयीमुळे त्याचं बऱ्याचदा नुकसान झाल्याचं देखील त्याने म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मलाइका अरोडा आणि अरबाज खान याच गोष्टीमुळे वेगळे झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेता अरबाजला सट्टा खेळत असतांना अनेकदा नुकसान झालं. यामुळेच मलाईकाने त्याच्याशी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

अभिनेता-प्रोड्यूसर अरबाज खानला ठाणे पोलिसांनी आयपीएलमध्ये सट्टेबाजीबाबत समन्स पाठवला होता. अरबाज बॉडीगार्ड शेरासोबत शनिवार सकाळी पोलीस स्थानकात आला.  पोलिसासमोर चौकशीसाठी येण्याआधी अरबाज सलमान खानला भेटण्यासाठी देखील गेला होता. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी बुकी सोनू जालानला अटक केली. त्याने या प्रकरणात अरबाज खानचं नाव घेतलं होतं.

चौकशीत अरबाजने खुलासा केला आहे की, त्याने 6 वेळा सट्टा लावला. अरबाजने हे देखील कबूल केलं की या दरम्यान त्याला करोडोंचं नुकसान झालं.