मुंबई : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमातून खळखळून हसणारी आणि कपिलच्या प्रत्येत विनोदाला दाद देणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंग हिला आपण सर्वजण ओळखतो. बऱ्याच काळापासून अर्चना मनोरंजन जगतामध्ये सक्रिय आहे. बहुविध भूमिका साकारत ती आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
अर्चना तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळं कायमच ओळखली जाते. पण, आता मात्र तिचा बदललेला स्वभाव पाहून बऱ्याच नेटकऱ्यांना हादरा बसला आहे. (Archana Puran Singh )
अर्चनावर अचानकच सर्वांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे, कारण ठरतंय तो म्हणजे एक व्हिडीओ.
अर्चना कायमच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या घरातील मदतनीसांचे व्हिडीओही पोस्ट करत असते. आता तिनं एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अर्चनाचं मदतनीस महिलेशी असणारं वागणं काहींना खटकलं.
व्हिडीओमध्ये नेमकं काय ?
व्हिडीओमध्ये अर्चनाच्या घरातील मदतनीस, भाग्यश्री या व्हिडीओमध्ये दिसते. जिथे ती अर्चनाची मुलं आपली नक्कल करत असल्याचं सांगताना दिसते.
तिथं अर्चनाचा मुलगा पोट धरून भाग्यश्रीवर हसताना दिसतो. खरंतर या व्हिडीओमध्ये भाग्यश्रीला अर्चना आणि तिची मुलं अगदी खेळीमेळीच्या वातावरणात काही बोलताना दिसत आहेत.
अर्चनाच्या घरात काम करणाऱ्या मदतनीस महिलेला हे सेलिब्रिटी कुटुंब आपल्यातीलच एक व्यक्ती असल्याप्रमाणं वागणूक देताना दिसत आहे. थोडक्यात काय, तर इथं भेदभावाला जागा नाही.
पण, नेटकऱ्यांनी मात्र याकडे वेगळ्याच नजरेतून पाहिल्याचं स्पष्ट होतंय. काहींनी अर्चनाच्या स्वभावाची इथं प्रशंसा केली असली तरीही काहींनी मात्र तिची खिल्ली उडवत, तू का वागलीस, असे प्रश्नही विचारले.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं?