मुंबई : कपिल शर्मा शो आपल्या नवीन सीझनमुळे बर्याच चर्चेत आहे. आगामी सीझनबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. त्याचबरोबर स्टारकास्टच्या फीसंदर्भात देखील बर्याच गोष्टी समोर येत आहेत. पण बर्याच जणांना निराश करणारी बातमी म्हणजे अर्चना पूरन सिंह कपिल शर्माच्या शोमध्ये परत येऊ इच्छित नाही. मीडिया रिपोर्टनुसार या सगळ्या गोष्टी फक्त अफवाच आहेत. 2019 मध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये जज असलेले नवज्योतसिंग सिद्धू वादात अडकल्यानंतर त्यांना हा शो सोडला. यानंतर अर्चनाने त्यांची जागा घेतली आणि तेव्हापासून त्या या कार्यक्रमाचा एक भाग आहेत.
गेल्या सिझनमध्येही अशी बातमी समोर आली होती की, अर्चना पूरन सिंगने द कपिल शर्मा शो सोडला आहे. अर्चना पूरन सिंह सध्या एका वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत, पण कॉमेडी शो कपिल शर्माच्या पुढील सीझनसाठी ती सज्ज झाली आहे. एका मुलाखती दरम्यान अर्चना पूरन सिंहने सांगितलं की, 'मला अशा कोणत्याही गोष्टी आणि बातम्यांची माहिती नाही. मी त्याच्या आगामी सीझनचा एक भाग होणार आहे. गेल्या वर्षीही मी जेव्हा सिरिजच्या शूटिंगला गेले होते तेव्हाही अशा अफवांना सुरुवात झाली होती.
अर्चना पूरन सिंह पुढे म्हणाली की, 'यावर्षीही मी एका सिरिजचं चित्रीकरण करत होते आणि लोकांनी असा विचार केला की, मी हा कार्यक्रम सोडतेय. या अफवांमध्ये कोणतेही सत्य नाही. मी शोमध्ये विनोदांचा आनंद घेते आणि कार्यक्रमातील संपूर्ण कलाकार स्टेजवर स्किट सादर करताना पाहते. हे खूप मनोरंजक आहे आणि हे खरं आहे की, कपिलने मला या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी निवडलं आहे. मी आगामी सिझनमध्येही एक भाग होण्यासाठी उत्सुक आहे.