यामुळे Archana Puran Singh ने मारलं स्वत:च्याच मुलाला

'द कपिल शर्मा शो'मध्ये अर्चना पूरण सिंह महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Updated: Oct 26, 2021, 06:35 PM IST
यामुळे Archana Puran Singh ने मारलं स्वत:च्याच मुलाला

मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये अर्चना पूरण सिंह महत्त्वाची भूमिका साकारत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच शोचे व्हिडिओ शेअर करत असते. पण नुकताच तिच्या मुलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अर्चनाची ईच्छा नसताना तिचा व्हिडिओ शूट करत आहे.

अर्चना मारलं मुलाला
अर्चना पूरण सिंग ही दोन मुलांची आई आहे. तिचे दोन्ही मुलगे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तिचा धाकटा मुलगा आयुष्मान सेठीने नुकताच इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तिच्या आईचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अर्चनाने स्वतः तिचे केस कापले आहेत. यानंतर ती यापुढे केस कापणार नाही असं म्हणताना दिसत आहे. यावर आयुष्मान म्हणतो की, तू समोर डस्टबिन ठेवला आहेस आणि हे ऐकून अर्चनाला समजतं की आयुष्मान हे रेकॉर्ड करत आहे यानंतर ती जाऊन आयुष्मानला मारु लागते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्चनाला आहेत दोन मुलं
'द कपिल शर्मा शो'मध्ये अर्चना पूरण सिंह आपल्या हसण्याने वातावरण प्रसन्न ठेवते. अर्चना पूरण सिंह अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वाचा एक भाग आहे आणि तिच्या कामाच्या पद्धतीमध्ये कालांतराने बरेच बदल झाले आहेत. अर्चना कधी हॉट सीन्स देताना, कधी जजच्या खुर्चीवर बसून स्पर्धकांना नंबर मार्क्स देताना दिसली आणि आजकाल ती द कपिल शर्मा शोच्या हॉट सीटवर बसलेली दिसत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की, अर्चना पूरण सिंगला दोन मुलं आहेत.