कपूर कुटुंबात लवकरच वाजणार सनई-चौघडे...

कोण करतंय लग्न? 

कपूर कुटुंबात लवकरच वाजणार सनई-चौघडे...

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय कपूर कुटुंब लवकरच चाहत्यांना खुशखबर देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कपूरची मुलगी रिया कपूर यावर्षी बॉयफ्रेंड करण बुलानीसोबत सात फेरे घेणार आहे. काही दिवसांपूर्वी रियाने इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये भाऊ-बहिण, आई-वडिल आणि सोनम कपूरचा नवरा आनंद आहुजासोबतच रियाचा बॉयफ्रेंड करण बुलानी दिसत आहेत. या फोटोला बघून लवकरच या घरात सनई चौघडे वाजणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

कपूर कुटुंबात 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नाची धूम होती. मीडिया रिपोर्टसनुसार, यावर्षी रिया आपल्या बॉयफ्रेंड करणसोहत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Sunday! 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor) on

सिनेमा निर्माती रिया कपूरचा बॉयफ्रेंड करण बुलानी सोनम कपूरच्या लग्नात दिसला होता. तसेच रियाचा चुलत भाऊ मोहित मारवाहच्या लग्नात देखील करण बुलानी सहभागी झाला होता. तसेच रिया अनेकदा बॉयफ्रेंड करणसोबत इंस्टावर फोटो शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

10 years later. Still lurking. Happy new year everyone.

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor) on

रिया कपूरने आपल्या करिअरला सुरूवात 'वेक अप सिध्द' या सिनेमातून केली असून निर्माता म्हणून 'आएशा' हा तिचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केली नाही. रियाद्वारे निर्मित केलेली 'खुबसुरत' ही दुसरी फिल्म होती. या सिनेमात सोनम कपूरच्या अपोझिट पाकिस्तानी कलाकार फवाद खान लीड रोलमध्ये होता. तसेच रिया आणि सोनम एकत्र 'रेसन' नावाचा एक फॅशन ब्रँड देखील चालवतात.