प्रेयसी मलायका नव्हे तर 'या' महिलेसाठी अर्जुन कपूरने गोंदवला टॅटू

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असतो

Updated: Jun 21, 2021, 06:02 PM IST
प्रेयसी मलायका नव्हे तर 'या' महिलेसाठी अर्जुन कपूरने गोंदवला  टॅटू title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे, याबद्दल काहीजण पापाराझींकडून तर  काहीजण त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाणून घेतात. अलीकडेच, अर्जुनला एक नवीन टॅटू मिळाला आहे, ज्याची एक झलक त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अर्जुनचा टॅटू
अर्जुन कपूरने एका खास महिलेच्या नावाने त्याचा हातावर टॅटू गोंदवून घेतला आहे आणि ही खास महिला दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची बहीण अंशुला आहे. अर्जुन कपूरच्या या व्हिडीओमध्ये 'A'हा शब्द दिसत आहे. त्याचबरोबर स्पॅडची आयकॉनही बनविण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना अर्जुनने लिहिलं की, - तो माझ्या बहिणीचा ईक्का आहे, अंशुला कपूर आणि मी आयुष्यात कायमच एकत्र जोडलेलो आहोत आणि ए लेटरच्या माध्यमातून देखील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

या आधीही गोंदवला होता टॅटू 
याआधी अर्जुन कपूरने 2019मध्ये टॅटू गोंदवला होता, ज्यामध्ये असं लिहिले आहे - ''पर अरदुआ अद अस्त्रा..'' अर्जुन कपूरचा हा दुसरा टॅटू होता त्याचा हा टॅटू त्याने डाव्या हातावर गोंदवला आहे.

अर्जुनचे चित्रपट
अभिनेता अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचे 'संदीप और पिंकी फरार' आणि 'सरदार का नातू' हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय अर्जुनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, 'एक खलनायक 2' आणि 'भूत पोलिस' यांचा समावेश आहे. 'एक व्हिलन 2' हा मल्टीस्टारर चित्रपट असून यामध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत. त्याचवेळी 'भूत पोलिस' मध्ये जॅकलिन फर्नांडीज अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.