अर्जुन रामपाल याचा छोटा मुलगा खूपच गोंडस, फोटो पाहून तैमूरला विसराल !

अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याचा छोटा मुलगा खूपच गोंडस आणि निरागस.. पाहा फोटो

Updated: Jul 19, 2021, 08:37 AM IST
अर्जुन रामपाल याचा छोटा मुलगा खूपच गोंडस, फोटो पाहून तैमूरला विसराल !

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याला एक मुलगा आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिने अरिकला जन्म दिला आहे. दोघेही बर्‍याच वर्षांपासून एकत्र राहत आहेत. अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याचा छोटा मुलगा नुकताच दोन वर्षांचा झाला आहे. अर्जुनने आपल्या लाडक्याचे अरिक नाव ठेवले आहे आणि अरिकचे हे स्मित तुमचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे.

अर्जुनचा मुलगा दोन वर्षांचा झाला

Arjun Rampal Son in Now 2 years Old

चाहत्यांना बर्‍याचदा त्यांच्या आवडत्या स्टारच्या मुलांची फोटो बघायचे असतात. हेच कारण आहे की छोट्या स्टारकीड्स नेहमीच प्रकाशझोताचा भाग असतात. अलीकडेच अर्जुन रामपाल याचा मुलगा दोन वर्षांचा झाला आहे आणि आपण त्याचा निरागसपणा आपल्या मनाला अधिक भावतो. (Pic Credit: Arjun Rampal Instagram)

2019 मध्ये अर्जुन पुन्हा बाबा

Arjun Rampal Became Father in 2019

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला एक मुलगा आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिने अरिकला जन्म दिला आहे. दोघेही बर्‍याच वर्षांपासून एकत्र राहत आहेत. 2019मध्ये अर्जुनने खुलासा केला होता की तो लवकरच वडील होणार आहे. या वृत्तामुळे अनेक लोक आश्चर्यचकित झाले. (Pic Credit: Arjun Rampal Instagram)

एक वर्ष कोणताही फोटो शेअर केला नाही!

Arjun Kept His Son Privacy

 2019 मध्ये गॅब्रिएला हिने अरिकला जन्म दिला. अरिकचा जन्म झाल्यापासून, गॅब्रिएला आणि अर्जुन (Gabriella Demetriades And Arjun Kapoor) यांनी मुलाच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली आणि त्याला पापाराझीच्या नजरेपासून दूर ठेवले. (Pic Credit: Arjun Rampal Instagram)

निरागसतेने हृदय जिंकले

Arjun Rampal Son is cute

अरिकच्या पहिल्या वाढदिवशी गॅब्रिएला आणि अर्जुन (Gabriella Demetriades And Arjun Kapoor) यांनी त्यांच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अरिकच्या निरागसतेने सर्वांचे मन जिंकले. अरिक आता दोन वर्षांचा आहे. (पिक क्रेडिट: अर्जुन रामपाल इंस्टाग्राम)

लग्न न करता मुलाला दिला जन्म

Arjun Become Father without getting Married

दरम्यान, अर्जुन आणि गॅब्रिएला (Gabriella Demetriades And Arjun Kapoor) यांनी अजून लग्न केलेले नाही आणि मुलगाही लग्न न करता झाला आहे. 18 जुलै 2019 रोजी अरिकचा जन्म झाला आहे. (Pic Credit: Arjun Rampal Instagram)

2018 मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट  

Arjun Rampal Divorce

अभिनेता अर्जुन रामपालने 1998 साली मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले. पण 20 वर्षानंतर म्हणजेच गेल्या वर्षी दोघांचेही घटस्फोट झाले. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन रामपाल याने सांगितले होते की, त्याच्या दोन्ही मुलींनी (माहिका आणि मायरा) गॅब्रिएला आपले मानले आहे. (Pic Credit: Arjun Rampal Instagram)