मराठमोळ्या अभिनेत्याचा अरूण गवळीच्या मुलीशी साखरपुडा

नवीन वर्षात अडकणार विवाहबंधनात 

Updated: Dec 24, 2019, 08:44 AM IST
मराठमोळ्या अभिनेत्याचा अरूण गवळीच्या मुलीशी साखरपुडा

मुंबई : गँगस्टर अरूण गवळी याची कन्या योगिता गवळी हिचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. योगिताचा साखरपुडा मराठमोळा अभिनेता अक्षय वाघमारेसोबत पार पडला आहे. या सोहळ्याला अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. 

अतिशय खासगी पद्धतीने हा सोहळा पुण्याच्या एका हॉटेलमध्ये पार पडला. अक्षय आणि योगिता गेल्या पाचवर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. कुटुंबियांनीच एकमेकांशी लग्न बंधनात अडकण्याचा सल्ला दिलेला. त्यानंतर आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचं अक्षय एका वृत्तपत्राला सांगतो. 

अक्षय आणि योगिता फेब्रुवारी 2020 मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. तसेच या सोहळ्याला क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश देशपांडे या कलाकारांनी हजेरी लावली होती. अक्षयने 'फत्तेशिकस्त', 'बेधडक', 'दोस्तीगिरी' आणि 'बस टॉप' सारख्या सिनेमांत काम केलं आहे.