Rekha मुळे मला चित्रपटातून काढलं, Aruna Irani यांचा मोठा खुलासा; कारणही सांगितलं

अरुणा इराणी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. अनेक दशकांनंतर अरुणा यांनी हा खुलासा केला. 

Updated: Feb 3, 2023, 05:48 PM IST
Rekha मुळे मला चित्रपटातून काढलं, Aruna Irani यांचा मोठा खुलासा; कारणही सांगितलं

बॉलिवूड अभिनेत्री अरुणा इराणी (Aruna Irani) गेल्या पाच दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अरुणा यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये हजेरी लावली होती. अनेक दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांसोबत अरुणा यांनी स्क्रीन शेअर केली आहे. फक्त नाटक नाही, चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. अरुणा यांनी कॉमेडी देखील केली आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरुणा यांनी खुलासा केला आहे की रेखा (Rekha) यांच्यामुळे त्यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 

अरुणा इराणी यांनी नुकतीच एएनआयला मुलाखत दिली होती. यावेळी त्या पॉडकास्टमध्ये अरुणा यांनी त्यांचे खासगी आयुष्यापासून व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यापैकी एक म्हणजे मंगलसूत्र या चित्रपटातूनं त्यांना रेखा यांच्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अरुणा यांनी एका मुलाखतीत हा खुलासा करत सांगितलं की, 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या मंगळसूत्र चित्रपटातून त्यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात रेखा मुख्य अभिनेत्री होती, तिनं निर्मात्याला त्यांना काढून टाकण्यास सांगितले होते.  

अरुणा इराणी यांचा सांगितलं कारण

अरुणा इराणी म्हणाल्या, "रेखा माझी खूप चांगली मैत्रीण होती. मंगलसूत्र या चित्रपटात मी अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारत होते, जी मेल्यानंतर भूत बनते, तर रेखा यात दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारत होती. जेव्हा त्यांनी मला कास्ट केलं, तेव्हा रेखानं मला चित्रपटातून काढून टाकलं. त्यानंतर मी निर्मात्यांकडे गेले आणि मला चित्रपटातून का काढून टाकलं असा सवाल केला तेव्हा काही अडचणी आहेत का? यावर निर्मात्यांनी सांगितले की जर मी तुम्हाला म्हणालो की रेखा जी यांना या चित्रपटात तुमच्यासोबत काम करायचे नाही.

अरुणा यांनी पुढे सांगितले की, त्यांनी नंतर रेखा यांना हा प्रश्न विचारला. त्यावर रेखा यांनी उत्तर दिले की, "जेव्हा मी तिच्यासोबत शूटिंग करत होती तेव्हा मी तिला सांगितले की मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. निर्मात्यांनी मला सांगितले की तू मला चित्रपटातून काढून टाकले आहेस. त्यावेळी तिनं स्पष्टपणे हो असं म्हटलं."

पुढे अरुणा म्हणाल्या की मी पुढे विचारलं की "तू असं का केलंस, तर तिनं सांगितलं की हे बघ अरुणा, जर चित्रपटात अभिनय जर थोडा खाली वर झाला असता तर मी विलेन आहे असे दिसले असते, त्यामुळे माझी इच्छा नव्हती की तू ती भूमिका साकारली पाहिजे. मी यावर देखील तिला प्रश्न विचारला की तू मला फोन करू शकत होतीस, तू असं का केलंस, हे चूकीचं आहे. मग ती म्हणाली, मला माफ कर, मी दुसरं काही करु शकत नव्हती, हा माझ्या करिअरचा प्रश्न होता, त्यामुळे मी असं केलं."