प्रेमाच्या दुनियेत आर्यनचे पदार्पण, कोणाला करतोय डेट?

 बॉलिवूड किड्सच्या चर्चांमध्ये किंग खान म्हणजेच शाहरूख खानची मुलं नेहमीच अव्वल स्थानी असतात. 

Updated: Jul 20, 2019, 04:48 PM IST
प्रेमाच्या दुनियेत आर्यनचे पदार्पण, कोणाला करतोय डेट? title=

मुंबई : सध्या बॉलिवूड किड्सच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. बॉलिवूडकरांची मुलं आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बॉलिवूड किड्सच्या चर्चांमध्ये किंग खान म्हणजेच शाहरूख खानची मुलं नेहमीच अव्वल स्थानी असतात. शाहरूखचा मुलगा आर्यन खान प्रेमात पडला आहे. आर्यन सध्या एका विदेशी मुलीला डेट करत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. 

आर्यन बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार अशा चर्च तर सर्रास होत असतात. परंतू आता आर्यन कोणत्या विदेशी मुलीला डेट करत आहे. याबद्दल त्याच्या सर्व चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे. आर्यन लंडन मध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. अशात त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे तो प्रकाशझोतात आला आहे.

आर्यन लंडनमधील एका ब्लॉगर मुलीला डेट करत आहे. शिवाय गैरी खान सुद्धा आर्यन डेट करत असलेल्या मुलीला भेटली आहे. अॅनिमेशच्या जगात साकारण्यात आलेल्या 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटामध्ये सिम्बा या व्यक्तीरेखेला आर्यनने आवाज दिला आहे