सविता भाभी तू इथंच थांब..... 'अश्र्लील उद्योग मित्र मंडळ' सिनेमाचं पहिलं गाणं

हा व्हिडिओ बघून पोटात पेटेल सुतळी बॉम्ब

Updated: Feb 27, 2020, 09:03 AM IST
सविता भाभी तू इथंच थांब..... 'अश्र्लील उद्योग मित्र मंडळ' सिनेमाचं पहिलं गाणं title=

मुंबई : 'सविता भाभी... तू इथंच थांब !!' नावाच्या होर्डिंग्जमुळे 'सविता भाभी'ची चर्चा सुरू झाली. काही दिवसांनी 'अश्र्लील उद्योग मित्र मंडळ' नावाचा सिनेमा येत असल्याची घोषणा देखील झाली. या सिनेमाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलर पाठोपाठ सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. 

अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात सविता भाभीची भूमिका साकारत आहे. तिच्यावर आधारित हे गाणं आहे. 'तुला बघायला जमली गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब' असे या गाण्याचे बोल आहेत. हा सिनेमा सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या नजरा आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाला आहे. 

'अश्लिल' असा शब्द उच्चारायला देखील जिथे लोकं थोडी धजावतात तेथे 'अश्र्लील उद्योग मित्र मंडळ' नावाचा सिनेमा 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभय महाजन, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ हे चेहरेही या सिनेमात दिसणार आहेत. आलोक राजवाडे या सिनेमाचं दिग्दर्शक करत आहे.

सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  'सविता भाभी' या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आता कलाकार याबाबत काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.