ट्विंकल खन्नाचं धक्कादायक ट्वीट म्हणाली, 'जगण्याची फक्त...'

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच अभिनेत्रीने पुन्हा एकदा अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Updated: Dec 11, 2023, 05:53 PM IST
ट्विंकल खन्नाचं धक्कादायक ट्वीट म्हणाली, 'जगण्याची फक्त...' title=

मुंबई : अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच अभिनेत्रीने पुन्हा एकदा अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या पोस्टवर ट्विंकल खन्नाने तिच्या कॉलमचा एक स्क्रिनशर्ट शेअर केला आहे.  48 वर्षीय ट्विंकल खन्नाने या कॉलमव्दारे तिच्या वाढत्या वयाविषयी चिंता व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली की, फक्त 50 वर्षांचा होण्याचा विचार करून मला भीती वाटते. 

तिने लिहीलं की, माझ्या रेग्युलर ब्लड टेस्टमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण शून्यावर आलं आहे. जे पाहून मला धक्का बसला आहे. मला आजही ते दिवस आठवतात जेव्हा माझ्यात खूप उत्साह होता. मी जितक्याही मुलांना भेटायची त्यातील बऱ्याच जणांसोबत मी मुलांसारखं वावरायची. आता माझ्यात खूप कमी उर्जा आहे आणि काही उरलेले चुटकुले. मला सत्याचा सामना नाही करायचा. हेच कारण आहे की, म्हणूनच मी यावर्षी माझ्या वाढदिवसाकडे दुर्लक्ष करत आहे. आणि मी आत्तापासूनच माझं वय सगळ्यांना ५० सांगत आहे. पण माझ्या मुलीने मला सुधारलं आणि म्हणाली, आई, तू अजूनही 49 वर्षांची आहेस. ती मला धीर देत आहे.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

24 वर्ष राहिलीत फक्त जगायची
ट्विंकल ने लिखती हैं कि 'मला 85 वर्षांपर्यंत जगायचं असेल तर मला आधी मी घालवलेली 50 वर्षे कमी करावी लागतील. यासाठी, मला दररोज 8 तासांचा 365 दिवसांनी गुणाकार करावा लागला आणि उरलेल्या अंदाजे 35 वर्षांचे रूपांतर करावे लागेल कारण हा वेळ मी झोपण्यात घालवत आहे.

अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्रीने लेखिका म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली आहे. 48 वर्षीय ट्विंकल खन्नाने केलेल्या वक्तव्यामुळे ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.,तिला 50 वर्षांचा होण्याचा विचार करून भीती वाटतेय. ट्विंकल खन्नाने अलीकडेच वृद्धत्वाच्या संकल्पनेबद्दल खुलासा केला आहे.