चक्क रिक्षाचालकानेच Anupam Kher यांना शिकवलं, की...

 अनुपम खेर रिक्षाचालकाच्या बोलण्यात हरवून जातात.

Updated: Dec 18, 2021, 03:43 PM IST
 चक्क रिक्षाचालकानेच Anupam Kher यांना शिकवलं, की... title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या मनोरंजक पोस्ट्ससाठी पसंती दिली जाते. कधी-कधी ते शिमल्याच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसतात. तर कधी-कधी ते अनिल कपूरसोबत खास क्षण घालवताना दिसतात.

कधी खेर आपल्या आईसोबत वेळ घालवताना दिसतात तर कधी आपल्या प्रियजनांसोबत आपले मन शेअर करताना दिसतात. यावेळीही अनुपम खेर यांनी असेच काहीसे केले आहे. अनुपमने शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिक्षाचालकाने सांगितली गीता

अनुपम खेर यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते ऑटो चालवणाऱ्या भूपती देवदासशी बोलताना दिसत आहे. त्यांच्या प्रवासादरम्यान अनुपम खेर अनेक विषयांवर बोलताना दिसत आहेत.

यादरम्यान रिक्षाचालकाने त्यांना भगवत गीतेचा पाठ शिकवला, इतकेच नाही तर शेवटी त्यांनी अनुपम खेर यांना चंडीचा पाठही सुनावला. हे ऐकून अनुपम खेर रिक्षाचालकाच्या बोलण्यात हरवून जातात.