महाराष्ट्रातील 67 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरेंनी दिली आनंदाची बातमी

Aditi Tatkare on Ladaki Bahin: 

Pravin Dabholkar | Updated: Dec 24, 2024, 07:32 PM IST
महाराष्ट्रातील 67 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरेंनी दिली आनंदाची बातमी title=
लाडकी बहीण

Aditi Tatkare on Ladaki Bahin: राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेचे हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले. पण त्यानंतर आलेल्या आचारसंहितेमुळे योजनेचे हफ्ते जमा झाले नव्हते. निवडणूक झाल्यानंतर हफ्ते जमा केले जातील, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

लाडकी बहीण योजनेतील पैशांचं वितरण सुरू झालं आहे. महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे.डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यातील 67 लाखांहून जास्त महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली होती. दरम्यान अदिती तटकरे यांनीदेखील यासंदर्भात अपडेट दिली आहे. 

काय म्हणाल्या अदिती तटकरे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67 लाख 92 हजार 292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती अदिती तटकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली.