मुंबई : 'अॅव्हेंजर्स' इन्फिनिटी वॉर हा सिनेमा केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने ५ दिवसांत अनेक सुपरडुपरहिट सिनेमांना मागे टाकलेय. भारतात या सिनेमाने तब्बल १३० कोटींचा आकडा पार केलाय. भारतात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. हा बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडेल यात शंकाच नाही. जगातील अनेक देशांमध्ये हा सिनेमाने सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरलाय. द. कोरिया, ब्राझील, थायलंड, यूएई, हाँगकाँग, व्हिएतनाम या देशांमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरलाय. २०१८मधील पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक करणारा भारतातील पहिला सिनेमा ठरलाय. याने भारतातल्या सगळ्या हिरोंना मागे टाकलेय.
भारतात हा सिनेमा २१०० स्क्रीन्सवर रिलीज झालाय. मोठ्या शहरांमध्ये पहिल्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा हाऊसफुल्ल होता. त्यात विशेष म्हणजे सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने या सिनेमाने जबरदस्त कमाई केली. भारतात हॉलीवूडच्या सिनेमांची क्रेझ काही कमी नाही. गेल्या काही वर्षांमधील बॉक्स ऑफिसवरील आकडा पाहता या सिनेमांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीये.
#AvengersInfinityWar continues its DREAM RUN... Mon biz is a SHOCKER... That too on 2000+ screens... Fri 31.30 cr, Sat 30.50 cr, Sun 32.50 cr, Mon 20.52 cr. Total: ₹ 114.82 cr NettBOC. India biz... GrossBOC: ₹ 147.21 cr... #Avengers #InfinityWar
— taran adarsh (@taran_adarsh) May 1, 2018
रोसो ब्रदर्स अर्थातच एंथोनी रोसो और जो रोसो दिग्दर्शित 'अॅव्हेंजर्स' इन्फीनिटी वॉर या सिनेमाची सुरुवात होते., यातली नेगेटिव्ह व्यक्तिरेखा साकरणाऱ्या थॅनॉसच्या एंट्रीनं. टाइटन ग्रहामध्ये राहणाऱ्या थॅनॉस मण्यांच्या शोधात आहे. याच मण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे आर्यनमॅन, हल्क, थोर, ब्लॅक विडो, स्पायडरमॅन, ब्लॅक पॅन्थर या सुपरहिरोजवर... अॅव्हेंजर्समध्ये अनेक एंटरटेनिंग टर्न एंड टि्वस्ट्स आहेत.. प्रत्येक सुपरहिरोची आपली वेगळी गोष्ट आहे.. या सिनेमातील युएसपी म्हणजे यातले अॅक्शन सीन्स, लोकेश्न्स आणि विएफएक्स.. सिनेमातील पटकथा सिनेमाला शेवटपर्यंत तितक्याच प्रभावीपणे सादर करण्यात मदत करते.. आयमॅक्स थ्रीमध्ये सिनेमा पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. या सिनेमाचा पुढचा भाग मे २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे..बच्चेकंपनीसाठी हा चित्रपट एक जबरदस्त ट्रीट आहे.