ATM Card Rules : आजकाल प्रत्येकजणाकडे बँकेत खाते असतं त्यामुळे त्यांच्याकडे एटीएम कार्डही असतंच. बँक खाते उघडल्यावर तुम्हाला पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्ड मिळतं. लोकांना या तीनही गोष्टींची गरज कुठल्या ना कुठल्या कामासाठी लागते. काही ठिकाणी आपल्याला चेकद्वारे पैसे द्यावे लागतात. तर आजकाल मोबाईल अॅपद्वारे बँकेत न जाताही आपण पैशांचे व्यवहार करतो. खात्यातून पैसे मिळवण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे एटीएम कार्ड. पण एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्याचे एटीएम कार्ड घरातील इतर सदस्य वापरु शकतात का? आपण अनेक वेळा इतर लोक ते एटीएम कार्ड वापरताना पाहिलं आहे, हे योग्य आहे की अयोग्य याबद्दल एटीएम कार्ड नियम सांगतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
साधारणपणे हे अनेकदा दिसून येतं की, जेव्हा एखाद्याच्या घरात कुटुंबातील सदस्याचं निधन होते. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याचे खाते हाताळू लागतात. त्यांच्या एटीएममधूनही पैसे काढतात. पण असे करणे कायदेशीर आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगतो की बँका अशा व्यवहारांना परवानगी देत नाहीत.
एखाद्याच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याचे एटीएम कार्ड वापरू शकत नाही. मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढणे हा कायदेशीर गुन्हा आहे. याबाबत बँकेला कळाले तर त्यानंतर बँक तुमच्यावर कारवाई करू शकते. तुम्हाला शिक्षाही होऊ शकते.
असे नाही की तुम्ही तुमच्या मृत नातेवाईकाच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला नियम आणि नियमांचे पालन करावे लागेल. सगळ्यात पहिले, मृत व्यक्तीच्या नावावर जी काही मालमत्ता आहे. तिला तिचं नाव ट्रान्सफर करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही त्याच्या खात्यातून पैसे काढू शकाल. जर तुमचं नाव मृत व्यक्तीच्या बँक खात्यात नॉमिनी म्हणून नोंदणीकृत असेल.
त्यानंतरही तुम्हाला याबाबत बँकेला कळवावे लागेल. असे झाल्यावर तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये मृत व्यक्तीचे पासबुक, खात्याचा टीडीआर, मृत्यू प्रमाणपत्र आणि तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड सादर करावे लागेल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता.