अनुष्काच्या वाढदिवसाचे विराटने केले स्पेशल प्लॅनिंग...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा काल वाढदिवस होता.

Updated: May 2, 2018, 09:42 AM IST
अनुष्काच्या वाढदिवसाचे विराटने केले स्पेशल प्लॅनिंग... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा काल वाढदिवस होता. क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न झाल्यानंतर तिचा हा पहिलाच वाढदिवस होता. त्यामुळेच विराटने तिच्यासाठी खास प्लॅनिंग केले होते. खरंतर काही दिवसांपूर्वीच हॉलिवूड सुपरहिरोची एव्हेंजर्स इनफिनिटी वॉर हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाचे भारतातही अनेक चाहते आहेत. याला अनुष्का आणि विराटही अपवाद नाहीत. म्हणून अनुष्काचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी दोघेही एव्हेंजर्स इनफिनिटी वॉर हा सिनेमा पाहण्यासाठी मॉलमध्ये पोहचले.

पहा व्हिडिओज...

हा सिनेमा पाहण्यासाठी दोघेही बंगळूरच्या एका मॉलमध्ये पोहचले. विरुष्का मॉलमध्ये येणार हे कळताच मॉलमध्ये चाहत्यांनी एकच गर्दी केली. तसंच त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी कोणीही सोडली नाही. त्या दरम्यानचे फोटोज आणि व्हिडिओज आता समोर येत आहेत. त्यावेळेस अनुष्का कॅज्युअल लूकमध्ये दिसली तर विराट ब्लॅक पॅंट आणि सिंपल टी शर्टमध्ये होता. दोघांचेही हे व्हिडिओज आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

New video of @virat.kohli & @anushkasharma at Orion Mall with the whole team to watch #AvengersInfinityWar  #virat #kohli #viratkohli #sports #cricket #cricketer #captainviratkohli #captainkohli #captainvk #captainfearless #runmachine #runmachinekohli #viratians #anushka #sharma #anushkasharma #bollywood #actress #anushkaholics #virushka #virushkareception #virushkawedding #Virushka #kingkohli #rcb #royalchallengersbangalore

A post shared by VirushkaUpdates (@virushkaupdates) on

या सिनेमातून लवकर येणार भेटीला

अनुष्काने वाढदिवसानिमित्त तिच्या ड्रिम प्रोजेक्टची घोषणा केली. मुंबईच्या बाहेर प्राण्यांसाठी एक शेलटर होम बनवण्याची तिची इच्छा आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली. अनुष्का लवकरच वरुण धवनसोबत सुई धागा सिनेमात झळकेल. त्याचबरोबर शाहरुख खानच्या झीरो सिनेमाचे शूटिंगही आता सुरू होईल. इतकंच नाही संजय दत्तच्या बायोपिकमध्ये पाहुणे कलाकार म्हणून अनुष्का वर्णी लावणार आहे.