Ranbir and Alia यांना लग्नाआधीचं मिळालं लाखामोलाचं गिफ्ट, कोणी दिलयं माहितीये?

रणबीर कपूर आणि आलिया भट्टला लग्नाआधी मिळालेल्या लाखमोलाच्या गिफ्टची चर्चा, त्यांना हे गिफ्ट कोणी दिलं, काय आहे त्यामध्ये?  

Updated: Apr 13, 2022, 11:34 AM IST
Ranbir and Alia यांना  लग्नाआधीचं मिळालं लाखामोलाचं गिफ्ट, कोणी दिलयं माहितीये? title=

मुंबई : अभिनेता आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू असताना लग्नाआधी दोघांना मिळालेल्या गिफ्टकडे सर्वांचं लक्ष आहे. आलिया आणि रणबीर लवकरचं नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहेत. लग्नाआधी आलिया आणि रणबीरला त्यांच्या खास मित्राकडून एक खास गिफ्ट मिळालं आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीने लग्नाआधी आलिया-रणबीरला लाखमोलाचं गिफ्ट दिलं आहे. 

अयानने आलिया आणि रणबीर स्टारर 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील एक गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. गाणं शेअर करत त्याने कप्शनमध्ये, 'फक्त रणबीर आणि आलियासाठी... दोघे लवकरचं एका नव्या आणि पवित्र प्रवासाला सुरुवात करणार आहेत.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तो पुढे म्हणाला, 'या संपूर्ण जगात आलिया आणि रणबीर माझ्यासाठी अत्यंत खास आहेत. दोघे माझ्यासाठी एक आनंदी आणि सेफ जग आहे..  देघांनी निस्वार्थपणे आमच्या सिनेमात काम केलं आहे....'

'आम्हाला फक्त त्यांच्या भेटीचा एक भाग शेअर करायचा होता, आमच्या सिनेमातील केसरिया गाणं... त्यांना भेट म्हणून.' असं म्हणत अयानने आलिया आणि रणबीरला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.