close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आयुष्मान खुराना 'या' अभिनेत्रीचा चाहता

आयुष्मान आणि भूमी ही जोडी लवकरच पुन्हा एकदा 'बाला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Jun 28, 2019, 02:02 PM IST
आयुष्मान खुराना 'या' अभिनेत्रीचा चाहता

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट त्याच्या वेगळ्या विषयामुळे, कथानकामुळे चर्चेत आहे. परंतु आयुष्यमानने नुकतंच बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला सर्वात मोठ्या स्टारचा किताब दिला आहे. आयुष्मानने अभिनेत्री भूमी पेडणेकरबाबत खुलासा केला आहे. भूमी पेडणेकर सर्वात मोठी 'डिवा' असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

आयुष्मान आणि भूमीने 'दम लगा के हईशा' आणि 'शुभ मंगल सावधान' या दोन चित्रपटांमधून एकत्र काम केलं आहे. आयुष्मानने 'बीएफएफ विद वोग- सीजन ३' या कार्यक्रमात भूमीबाबत विधान केलं. अभिनेत्री नेहा धूपियाने आयुष्मानला त्याची आवडती अभिनेत्री कोण? यावर सवाल केला असता त्याने भूमीचं नाव घेतलं.

'बीएफएफ'च्या गेम सेगमेंट 'से इट आणि स्ट्रिप इट'च्यावेळी शोची सुत्रसंचालिका नेहा धूपियाने आयुष्मानला आतापर्यंतची सर्वात मोठी 'डिवा', जिच्यासोबत त्याने काम केलं आहे, त्या अभिनेत्रीबाबत प्रश्न विचारल्यावर त्याने भूमीचं नाव घेतलं. 'भूमी तिच्या पहिल्या चित्रपटातही 'डिवा' होती...वजन कमी करण्यासह तिच्यामध्ये 'डिवा'चे सर्व गुण असल्याचंही' त्याने म्हटलंय. 

Ayushman Khurana, Bhumi Pednekar

आयुष्मान आणि भूमी ही जोडी लवकरच पुन्हा एकदा 'बाला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतमही असणार आहे. याशिवाय आयुष्मान 'ड्रीम गर्ल', 'गुलाबो सिताबो' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटांमधूनही झळकणार आहे.