सततच्या फ्लॉप चित्रपटांना घाबरला Ayushmann Khurrana, नाईलाजात करुन बसला 'हे' काम

 बॉलीवूड जगतात चित्रपट सतत फ्लॉप होत आहेत आणि त्यामुळे अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. 

Updated: Sep 29, 2022, 01:25 PM IST
सततच्या फ्लॉप चित्रपटांना घाबरला Ayushmann Khurrana, नाईलाजात करुन बसला 'हे' काम title=

मुंबई : बॉलीवूड जगतात चित्रपट सतत फ्लॉप होत आहेत आणि त्यामुळे अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. आयुष्मान खुराना त्यापैकीच एक आहे.  आयुष्मान खुरानाने आपल्या सर्वोत्कृष्ट आणि वेगळ्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर दुसरीकडे त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही धमाल केली आहे.

पण आयुष्मानचे शेवटचे दोन रिलीज झालेले चित्रपट 'अनेक' आणि 'चंदीगढ करे आशिकी' काही विशेष करू शकले नाहीत. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे अभिनेत्याचं मोठं नुकसानही होत आहे. आता याच कारणासाठी अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. 

आयुष्मानने कमी केली फी! 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुष्मान खुरानाने त्याची फी कमी केली आहे. आयुष्मान खुरानाने त्याची फी शुल्क २५ कोटींवरून १५ कोटी रुपये केली आहे. याचं कारण म्हणजे 'अनेक' आणि 'चंडीगढ़ करे आशिकी' हे फ्लॉप ठरलेले सिनेमा. आयुष्मानच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी आयुष्मानला त्याची फी कमी करण्यास सांगितलं आणि या कठीण काळात त्याचा पाठिंबा मागितला. तर आयुष्माननेही या प्रकरणावर त्याचं समर्थन केलं आहे. आयुष्मान आता त्याच्या आगामी चित्रपटासाठी 25 नव्हे फक्त 15 कोटी रुपये घेत आहे.

आयुष्मान शूटिंगमध्ये व्यस्त आहे
आयुष्मान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'डॉक्टर जी' मध्ये खूप व्यस्त आहे. त्याचबरोबर, अभिनेत्याकडे यावेळी अनेक ऑफर आहेत.  अभिनेता 'डॉक्टर जी' नंतर 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसणार आहे. यानंतर, तो वर्षाच्या शेवटपर्यंत पुढील चित्रपट साइन करू शकतो. आयुष्मानला खात्री आहे की, त्याचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करतील.

अनेक अभिनेत्यांची फी कमी!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुष्मान खुराना हा एकमेव अभिनेता नाही ज्याने इंडस्ट्रीला पाठिंबा देण्यासाठी आपली फी कमी केली आहे. रिपोर्टनुसार, अक्षय कुमारनेही त्याची फी 144 कोटींवरून 72 कोटी रुपये केली आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम, शाहिद कपूर आणि राजकुमार यांसारख्या स्टार्सनीही त्यांची फी जवळपास निम्म्याने कमी केली आहे. सर्वांनी मिळून पुन्हा एकदा सिनेमाला पुढे नेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे.