अरेरे! भर कार्यक्रमात सलमानचा उल्लेख होताच ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा उडाला रंग, Video व्हायरल

पोन्निवन सेल्वन I या चित्रपटाच्या निमित्तानं ऐश्वर्या नुकतीच एका प्रेस कॉन्फरन्सला हजर होती.

Updated: Sep 29, 2022, 12:58 PM IST
अरेरे! भर कार्यक्रमात सलमानचा उल्लेख होताच ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा उडाला रंग, Video व्हायरल title=

Aishwarya Rai and Salman Khan: सलमान खान आणि ऐश्वर्या रॉयचं (Salman Khan & Aishwarya Rai) प्रेम प्रकरण खूप गाजलं. आजही हे प्रकरण खूप चर्चिले जाते. आज ऐश्वर्या अभिषेकबरोबर आपल्या वैवाहिक जीवनात खुप सुखी आहे परंतु सलमानचं नाव घेणंही कधीकधी ऐश्वर्याला त्रासदायक ठरते. यातलं काय खरं काय खोटं याची माहिती नाही परंतु ऐश्वर्याचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सलमानचा उल्लेख केल्यानं ऐश्वर्याच्या चेहऱ्यांचा रंग उडालेला दिसतो आहे. (Ponniyin Selvan I actress aishwarya rai bachchan feel embrassed on hearing about ex boyfriend salman khan)

ऐश्वर्या रॉय बच्चन हिचा पोन्निवन सेल्वन I (Ponniyin Selvan I) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने ऐश्वर्या रॉय बच्चन आपल्या या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं सगळीकडे प्रमोशन करते आहे. त्यासाठी ऐश्वर्यालाही अनेक प्रश्न विचारले जात आहेत. परंतु यंदा असाच एक प्रश्न विचारला गेला ज्या प्रश्नाच्या उत्तरात सलमान खानचा उल्लेख होता. हा प्रश्न थेट ऐश्वर्याला नसला तरी सलमान खानच्या उल्लेखानं ऐश्वर्याचा चेहरा बदलला. 

पोन्निवन सेल्वन I या चित्रपटाच्या निमित्तानं ऐश्वर्या नुकतीच एका प्रेस कॉन्फरन्सला हजर होती. त्यावेळी या चित्रपटाची संपुर्ण स्टार कास्ट या या कॉन्फरन्सला उपस्थित होती. या दरम्यान एकाने चित्रपटाच्या स्टारकास्टमधील एक अभिनेत्या प्रश्न विचारला की तुमचा आवडता सिनेमा कोणता तेव्हा त्यानं सलमान खानच्या तेरे नाम (Salman Khan Tere Naam) या चित्रपटाचा उल्लेख केला. 

त्यावेळीच ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंग उडला. तरीही त्यानंतर तिनं सगळ्यांच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दिली आणि कार्यक्रम एन्जॉय केला.