'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर 'देवमाणूस'मधील अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

अजित कुमार देव याला धडा शिकवण्यासाठी आलेल्या दिव्या सिंगला देखील प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.

BGR | Updated: Aug 5, 2021, 07:44 PM IST
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर 'देवमाणूस'मधील अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

मुंबई :  स्मॉल स्क्रिनवरील देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला रसिकांचे भरभरुन प्रेम मिळतं आहे. 
सोशल मीडियावरील देखील प्रत्येक कलाकाराचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मालिकेत कमी कालावधीसाठी झळकणारा पाहुणा कलाकार प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं अस्तित्व तयार करताना दिसून येत आहे.

अजित कुमार देव याला धडा शिकवण्यासाठी आलेल्या दिव्या सिंगला देखील प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. इंस्टाग्राम अभिनेत्री नेहा खान नवनवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

नुकताच तिने चला हवा येऊ द्याच्या मंचावर खास परफॉर्मन्स केला. यासाठी तिने केलेला बोल्ड लूक खूपच चर्चेत आहे. सेटवरील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

सोबतच तिने एक डान्स व्हिडिओ देखील शेअर केला आहे. नेहाचं सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोविंग आहे.